शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus News : कोरोनामुक्त रुग्णांच्या मदतीसाठी 'कोविड कवच' ; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अ‍ॅप विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:01 IST

कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना अ‍ॅपमधून आपली समस्या मांडता येईल...

ठळक मुद्देअ‍ॅपमध्ये प्लाझ्मा दान आणि कोरोनाविषयी विविध प्रश्नांबाबत जनजागृतीपर माहिती असणार

पुणे : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुढील काही दिवस आरोग्य विविध समस्या जाणवत आहेत. त्याबाबत त्यांना योग्य मागर्दर्शन  मिळावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कोविड कवच हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपद्वारे कोरोनामुक्त झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपली समस्या मांडता येईल. त्यावर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून सल्ला दिला जाईल.

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होणे, काही महिने श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुस, किडनीचे आजार, हृदयरोग अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने रुग्णालयांमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याचअनुषंगाने ‘कोविड कवच’ हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अ‍ॅपसाठी वैद्यकीय शिक्षणचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे व उपअधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी पुढाकार घेतला. तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांनी अ‍ॅप विकसित करण्यात मदत केली आहे.कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना अ‍ॅपमधून आपली समस्या मांडता येईल. त्यानंतर त्यामध्ये निवडलेल्या एका शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ ‘एसएमएस’द्वारे मागर्दर्शन करतील. प्रत्येक रुग्णालयात एक तज्ज्ञ मदतीसाठी सज्ज असेल. तसेच अ‍ॅपमध्ये प्लाझ्मा दान आणि कोरोनाविषयी विविध प्रश्नांबाबत जनजागृती करणारी माहिती असणार आहे.------------------कोरोनामुक्त व्यक्तींवर होणार संशोधन..कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींची सध्याची आरोग्य विषयक माहिती अ‍ॅपद्वारे भरून घेतली जाणार आहे. त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, फुफ्फुस, किडनी आजार, हृदयरोग यांसह विविध आजारांची तीव्रता वाढली किंवा कमी झाली, आरोग्यामध्ये आणखी काही समस्या उद्भवल्या याची माहिती घेतली जाईल. त्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. याद्वारे मिळालेली माहिती संकलित करून त्याचा अभ्यास केला जाईल. कोरोनानंतर निर्माण होणाऱ्या समस्या शोधणे, त्यामुळे शक्य होणार आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.---------------------  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल