शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

Corona Virus News : पुणे शहरात रविवारी २७३ तर पिंपरीत १२३ नवे कोरोनाबाधित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:35 IST

Pune शहरात रविवारी ३४५ रुग्ण झाले बरे : ३ रुग्णांचा मृत्यू 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २७३ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ३४५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ४९८ झाली आहे.   

 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०६ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, २९३ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७०३ झाली आहे.  रविवारी एकूण ३४५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७५ हजार ९७३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८३ हजार १७४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ४९८ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २०५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ८१ हजार १२२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.....पिंपरीत १२३ नवे कोरोनाबाधित

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा पुन्हा कमी झाला आहे. दिवसभरात १२३  जण पॉझिटिव्ह आढळले असून १५१  जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे.  मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.  तर १ हजार ५३२ जणांना डिस्चार्ज दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा कमी झाला असून कोरानामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील विविध रुग्णालयात १ हजार ४६४ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ३५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २ हजार ४३२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या  ६२२ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त झाले १५१  दिवसभरात १५१ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५ हजार ५६३ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ हजार ८६१ वर पोहोचली आहे...........कोरोनामुळे एकाचा बळीशहरात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.  शहरातील एकाचा बळी घेतला आहे. त्यात दिघी येथील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत झालेल्या मृतांमध्ये पुरूष, साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत असून तरूणांचा समावेश दिसून येत आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७८६ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल