शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०५ जण कोरोनामुक्त ; ७७९ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 20:56 IST

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढ रोडावली.. 

ठळक मुद्देसद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४३ कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपचार सुरूदिवसभरात उपचारादरम्यान शहरात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यूअ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार २२८ इतकी

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सोमवारीही कायम राहिले असून, आज १ हजार १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची वाढ मोठ्या प्रमाणात रोडावली असून, रविवारचे बाकी चाचणी अहवाल व आजचे अहवाल पाहता आज केवळ ७७९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४३ कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५२० जण व्हेंटिलेटरवर तर ४२३ जण आयसीयूमध्ये आहेत. तर ३ हजार ३९३ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात उपचारादरम्यान शहरात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत.     शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आजअखेर १ लाख ४२ हजार ९१५ झाली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार २२८ इतकी आहे. रविवारच्या तुलनेत आज अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या सुमारे ३०० ने कमी झाली आहे.      आजपर्यंत एकूण बाधितांपैकी १ लाख २२ हजार २८१ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत ३ हजार ४०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल