शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : 'जम्बो कोविड सेंटर'चे पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट; जूनमध्ये संपणार तीन महिन्यांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 20:32 IST

आयआयटी दिल्लीने जम्बोच्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तीन महिन्यांच्या सुस्थितीचे प्रमाणपत्र दिले होते.

पुणे : शहरातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर २२ मार्च रोजी जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी जम्बोच्या सांगाड्याचे दिल्ली आयआयटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले होते. त्यांनी तीन महिन्यांची मुदत दिलेली होती. ही मुदत जून महिन्यात संपते आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुन्हा एकदा जम्बोचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. 

शहरातील रुग्ण कमी झाल्याने १५ जानेवारी रोजी जम्बो बंद करण्यात आले होते. दिल्ली आयआयटीने सांगाड्याचे सुस्थितीविषयक प्रमाणपत्र दिल्यानंतर २२ मार्चपासून प्रत्यक्ष रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर जम्बोमुळे दिलासा मिळाला. रुग्णालयाची क्षमता ७०० खाटांपर्यंत वाढविण्यात आली. यापूर्वी महापालिका, पीएआरडीए आणि जिल्हाप्रशासनाच्या सहभागातून जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत जम्बोचे पूर्ण व्यवस्थापन महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले. 

आयआयटी दिल्लीने जम्बोच्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तीन महिन्यांच्या सुस्थितीचे प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र जूनपर्यंतचे असल्याने पुन्हा ऑडिट करून घ्यावे लागणार आहे. सांगाड्याची क्षमता नसेल तर ऐन पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यावेळीही जम्बोची आवश्यकता भासणारच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा हे ऑडिट केले जाणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला।हे काम सोपविले जाण्याची शक्यता आहे. -------स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जर जम्बोचा सांगाडा कमकुवत झाल्याचे आणि तो उतरवण्याची आवशक्यता  निष्पन्न झालेच तर ७०० रुग्णांना हलवायचे कुठे असा प्रश्न  निर्माण होणार आहे. त्यामुळे पालिकेला 'प्लान बी' तयार ठेवावा लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन विचार करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका