शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : धनकवडी परिसरात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना प्रशासन मात्र ढिम्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 12:56 IST

धनकवडीत कोरोनाबाधितांची संख्या सात वर

ठळक मुद्देअजूनसुध्दा उपाययोजना आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून नाही कडक अंमलबजावणी

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महापालिका, पोलीस, आरोग्य विभाग आणि प्रशासन यांच्याकडून विविध पावले उचलली जात आहे.मात्र,धनकवडी परिसरात अजूनसुध्दा उपाययोजना आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून कडक अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण आहे.  धनकवडी गावठाणात कोरोना बाधित पहिला रूग्ण सापडून दहा दिवसांचा कालावधी उलटला आणि पाठोपाठ ती संख्या सात वर जाऊन पोचली आहे. तरीही प्रशासनात सक्रियतेचा अभाव आढळला आहे. धनकवडी, भारती विद्यापीठ परिसरात गल्लोगल्ली, चौकात आणि रस्तोरस्ती भाजी विक्रेत्यांनी तर अच्छाद मांडला होता. भाजी विक्रेत्यांची अचानक वाढलेली  संख्या आणि सोशल डिस्टस्निंगचा उडालेला फज्जा या आठवडा भरातील बेशिस्तीचा धोका कोरोना सक्रमणाला कारणीभूत ठरेल यांचाही विचार प्रशासनाकडून झाला नाही. कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला तो भाग सील करणे, हाय रिस्क संपकार्तील कुटुंबियांना तपासणीसाठी नेणे, रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी करणे त्यांना शोधून विलगीकरण करणे आदी उपाययोजना होताना दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे.  सर्दी खोकल्याने त्रस्त एका रूग्णाची माहिती जबाबदार नागरिकांनी दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय जागे झाले होते. त्यानंतर तो रूग्ण कोरोना बाधित निघाल्याचेही समोर आले आहे. या वातावरणात प्रशासनाची उदासिनता धनकवडीकरांसाठी धोकादायक ठरू नये यासाठी अनेक सामाजिक संस्था,मंडळांनी एकत्र येवून अधिकारी, पोलिस आणि लोकप्रतिनिधींना उपाययोजना वेगाने व्हाव्यात अशी विनंती केली होती. मात्र, प्रशासन, स्थानिक प्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली आणि प्रत्यक्ष कृती शून्यच राहिली त्यामुळ्े कोरोना बाधितांची संख्या वाढत असूनही नागरिकांची चिंता वाढवत आहे. कोरोनाचा एक रूग्ण सापडला तरी ज्या वेगाने प्रशासन ईतरत्र उपाययोजना करते तीच उपाययोजना धनकवडीत झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटने ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणीच होत नसल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. सात रूग्ण सापडूनही प्रशासनाचा ढिसाळपणा कायम आहे.  सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे तो तीन मे पर्यंत असेल, मात्र पुण्यासह उपनगरांमधील सध्याची परिस्थिती पहाता तो वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. शहरातील मध्यभाग सील केला आहे. धनकवडीमधील सुद्धा कोरोना बाधित भाग सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 'अत्यावश्यक' गोष्टींसाठी दोन तास दिलेत. पण या दोन तासांत नागरिक लॉकडाऊनची वाट लावत आहे. 

टॅग्स :DhankawadiधनकवडीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या