शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २६६ रूग्णांची वाढ; एकूण रूग्णसंख्या ६ हजार ७९५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:49 IST

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देतब्बल १६९ रुग्ण झाले बरे : १६५ अत्यवस्थ तर २५ रूग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार ७९५ वर जाऊन पोचला असून मंगळवारी दिवसभरात २६६ रूग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात बरे झालेल्या १६९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ३३१ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २६६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात मंगळवारी २५ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३४५ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२८ रुग्ण, ससूनमधील ०२ तर  खासगी रुग्णालयांमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ११९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३३१ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १५४३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५२ हजार ४६० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६१६, ससून रुग्णालयात १५१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका