शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : मुंबईतून वडगाव निंबाळकरला आलेल्या आजींना कोरोना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 13:21 IST

गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्ह कोरोना अहवाल आलेल्या रुग्णांचे  मुंबई 'कनेक्शन ' असल्याचे उघड

ठळक मुद्देगावात एक रात्र मुक्कामानंतर पुण्यात नेले होते उपचारासाठी 

बारामती : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात ५ वा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. तालुक्यातील मुर्टि पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात रुग्ण आढळला आहे. ७५ वर्षाच्या आजारी आजीबाई मुंबई येथिल रहिवासी आहेत . त्या त्यांच्या मुलीच्या घरी १५ मे रोजी सायंकाळी हवापालट करण्यास  आल्या होत्या .घरी आल्यावर श्वसनाचा त्रास वाढल्याने प्रकृती बिघडल्याने आजींना दुसऱ्याच दिवशी १६ मे रोजी ससून रुग्णालयात हलविण्यात आले.या ठिकाणी केलेल्या तपासणीत आजींना  कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात सापडलेला हा चौथा रुग्ण आहे. तर बारामती परिसरातील हा बारावा रुग्ण आहे. मात्र त्या केवळ एका रात्रीसाठी वडगाव निंबाळकर येथे मुक्कामी होत्या.दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्यात नेण्यात आले .त्या ठिकाणी केलेल्या तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बारामतीचा याचा काही संबंध नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमने यांनी ' लोकमत ' शी बोलताना दिली .दरम्यान , बारामतीत आजपर्यंत दोन रुग्णांचा रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फल येथील रुग्णावर मुंबईत , तर माळेगाव आणि मूर्टि च्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत .दरम्यान , बारामतीत आजपर्यंत  दोन रुग्णांचा  रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत .कट्फल येथील रुग्णावर मुंबईत , तर माळेगाव आणि मूर्टि च्या रुग्णावर बारामती येथे उपचार सुरू आहेत .बारामती शहर कोरोना मुक्त झाले आहे. मात्र पुणे मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला आहे .ग्रामीण भागात आता रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरवात झाली आहे .गेल्या दोन दिवसात पॉझिटिव्ह कोरोना अहवाल आलेल्या रुग्णांचे  मुंबई 'कनेक्शन ' असल्याचे उघड झाले आहे .बाहेरून आलेल्या लोकांमुळे रुग्ण वाढण्याची भीती आहे .बारावा रुग्ण सापडल्याने बारामती तालुका धस्तावला आहे.वडगाव येथील सर्व दुकाने, व्यवहार बंद करण्यात आली आहेत .सलग बारावा रुग्ण सापडल्याने बारामतीची  ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल सध्या तरी संपुष्टात आली आहे .बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे  कोरोनाचा धोका वाढणार आहे .

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई