शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पूर्व हवेलीत चार कामगार व एक महिला कोरोनाबाधित; हडपसर येथील नामांकित कंपनीत कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:31 IST

सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाबाधित रुग्ण

ठळक मुद्देकदमवाकवस्ती येथील एक व मांजरीत चार असे एकूण पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न

पुणे(कदमवाकवस्ती ) : पूर्व हवेलीतील कवडीमाळवाडी(कदमवाकवस्ती) येथील एक व मांजरी येथील चार असे एकूण पाचजण कोरोना बाधित असल्याचे मंगळवारी(दि.२६) रात्री उशिरा निष्पन्न झाले.यातील चार जण हे हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमध्ये कामगार आहेत तर एक कामगाराची पत्नी आहे, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.डी.जे.जाधव यांनी दिली.     मागील गुरुवारपासून सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मंगळवारीही कायम राहिले आहे. यामुळे पुणे शहराप्रमाणेच पूर्व हवेलीत कोरोनाने हातपाय पसरल्याचे आढळून आले आहे.     हडपसर परिसरातील वरील नामांकित काम करणारे मात्र पूर्व हवेलीत राहणारे सात कामगार व एका कामगाराचा सहा वर्षीय मुलगा व एका कामगाराची पत्नी असे नऊ जण मागील पाच दिवसाच्या कालावधीत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. हडपसर परिसरातील वरील कंपनीशी निगडीत असणारे मांजरी बुद्रुक, आळंदी म्हातोबाची व कदमवाकवस्ती हद्दीतील तब्बल नऊ जण कोरोनाबाधित सापडल्याने, पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.     हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील काही कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने गुरुवारपासून (दि. २१) कामगारांच्या कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यात रविवारी (दि.४) आळंदी म्हातोबाची येथील एक तर मांजरी बुद्रुक हद्दीतील एक असे दोन कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. तर मागील दोन दिवसात कदमवाकवस्ती व मांजरी बुद्रुक हद्दीतील चार कामगार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण एकाचवेळी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.      याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील काम करणारे चार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी रात्री उशीरा निष्पन्न झाले आहे. वरील चारही कामगारांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व घरातील सदस्य अशा सर्वांची कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. मागील पाच दिवसात तब्बल नऊ जण कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांनी आपआपली काळजी घ्यावी.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल