शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

Corona virus : बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण ; रुग्णांची संख्या पोहचली ३५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 19:56 IST

बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे.

ठळक मुद्देबारामतीच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध आणले जाणार

बारामतीबारामती शहर,तालुक्यात एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहर व तालुक्यात प्रथमच एकाच दिवशी पाच  कोरोनाबाधित रुग्णआढळले आहेत.त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अशोकनगर येथील एका वकिलांच्या पत्नीसह शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलाचा देखील या रुग्णांमध्ये समावेश आहे. तीन दिवसांपुर्वी शहरातील संगणक अभियंत्याला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्या अभियंत्याच्या काटेवाडी(ता.बारामती) येथील ५४वर्षीय मित्राला कोरोना संसर्ग झाल्याचे मिळालेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. शिवाय सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे शाखेत कार्यरत असलेल्या ३० वर्षीय कर्मचाऱ्यासह तांबेनगरमधील २३ वर्षीय युवक कोरोना पॉझिव्ह आला आहे.त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकाचा ३४ वर्षीय मुलगा,ज्येष्ठ वकीलाची ६७ वर्षीय पत्नीसह एकुण सहा जणांना कोरोना संसर्गझाला आहे.शहर कोरोनामुक्त झाल्याने बारामतीकर निश्चिंत होते. शहरात व्यापारपेठ, दैनंदिन व्यवहार देखील सुरळीत सुरु होते. नागरीकांनी कोरोनावर मात केल्याचे मानले जात होते.मात्र, आज एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित निघाल्याने हा समज खोटा ठरला आहे.  आज सापडलेल्या रुग्णांच्या रुपाने शहरातील उच्चभ्रु वसाहतीत कोरोनाने शिरकाव केला आहे.  दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बैठक घेत शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला तातडीने कोरोना केअर सेंटर करुन येथील सर्व कामकाज एमआयडीसीतील महिला रुग्णालयातून करण्याचे निर्देश दिले.तसेच याबाबत पवार यांनी आरोग्य विभागास आदेश दिले आहेत.लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझर्सचा वापर करावा,अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरु नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बारामतीतील बैठकीत केले आहे.———————————...शहरातील व्यवहारांवर पुन्हा निर्बंधबारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामतीच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध आणले जाणार आहेत. प्रशासनाने यापुर्वी शहरातील व्यवहार सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरुठेवण्याचे आदेश दिले होते.त्यामध्ये बदल करीत हे व्यवहार आता सकाळी ९ तेसायंकाळी  ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.———————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवार