शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : 'कोरोना'ची चाचणी न्यायालयाने सर्वांसाठी केली मोफत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:48 IST

कोविद-१९ च्या संकटाशी न्यायपालिका कशी झगडते आहे?

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत न्यायालयांचे कामकाज अगदी मर्यादित होणार सद्यस्थितीत सर्वोच न्यायालय हे सरकारपेक्षा जास्त चांगला धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही.

-अ‍ॅड. अभय आपटे- कोविद १९ चे संकटाशी झगडताना सर्व भारतीय नागरिक, उद्योग व्यवसाय तसेच न्यायपालिकांसारख्या घटनेने स्थापन केलेल्या संस्थाही एकत्र आल्याचे दिसत आहे. देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान सर्वोच्य न्यायालयापासून ते कनिष्ठ न्यायालयापर्यंत सर्वांनीच काम बंद ठेवून केवळ अत्यंत तातडीची प्रकरणे हाताळण्याचा निर्णय केला आहे. त्यातही प्रत्यक्ष वकील व पक्षकार हजर न करता प्रकरणे व्हिडिओद्वारे सुनावणी केली जात आहे. तातडीच्या कारणाशिवाय न्यायालयात येणाऱ्यांना मोठा दंड ठोठावला आहे. जेणेकरुन न्यायालयात गर्दी होणार नाही. 

हे चालू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने काही ऐतिहासिक व महत्त्वाचे निर्णयही दिले आहेत. दि. 23 मार्च 2020 रोजी सर्वोच्य न्यायालयाने एक अभूतपूर्व निकाल दिला. कोविद 19 च्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत न्यायालयांचे कामकाज अगदी मर्यादित होणार आहे, जवळपास ते ठप्पच होणार आहे. हे पाहता अनेक पक्षकारांची न्यायालयात अर्ज़, याचिका, दावे दाखल करण्यासाठीची मुदत निघुन जाऊ शकते. याचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम १४२/१४१ ने दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करुन अशी मुदत १५ मार्चपासुन पुढील आदेश येईपर्यंत स्वअधिकारात (suo moto ) वाढविली आहे. 

सद्यस्थितीत सर्वोच न्यायालय हे सरकारपेक्षा जास्त चांगला धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगून सर्वोच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिनांक  ७ एप्रिल रोजी, कोवीद 19 चे प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित कामगारांना किमान वेतन सरकारने द्यावे, या विषयावर दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोणताही आदेश पारित करण्यास नकार दिला. 

तर कालच सर्वोच्च न्यायालयाच्या दुसरया खंडपीठाने आर्थिक दुर्बलतेमुळे कोणत्याही भारतीयाची कोविद चाचणी राहु नये, यासाठी सर्व भारतीय नागरिकांना शासकीय अथवा मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेत कोविद १९ ची चाचणी मोफत करून दयावी,असा अंतरिम आदेश दिला आहे. आता यापुढील सुनावणीत हा खर्च कोणी सोसायचा या विषयी काय आदेश होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. या सर्व सुनावण्या व्हिडीओद्वारे होत आहेत. 

थोडक्यात या विश्वव्यापी संकटाचा सामना करण्यासाठी न्यायपालिकाही सरसावली आहे हे नक्की. आता न्यायपालिका अशा रोज जास्त गंभीर होणाऱ्या परिस्थितीत तटस्थतेची भूमिका घेते की वेळप्रसंगी हस्तक्षेप करते हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

                                                                                                                                                  (लेखक ज्येष्ठ वकील आहेत.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याadvocateवकिल