शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Corona Virus : कोरोनाने पुणेकरांचं टेन्शन वाढवलं! प्रशासन यंत्रणा मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 13:30 IST

पुणे शहरात बुधवारी २५०० च्या वर तर संपूर्ण जिल्ह्यात ५०००च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन यंत्रणा प्रचंड हादरली आहे.

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. पुणे शहरात बुधवारी २५०० च्या वर तर संपूर्ण जिल्ह्यात ५०००च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन यंत्रणा प्रचंड हादरली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांवर आणखी कठोर निर्बंध लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचा प्रशासन यंत्रणा आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्याच धर्तीवर मागील आठवड्यात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय न घेता रात्री १० वाजता संपूर्ण पुणे 'लॉक' करण्याचा आदेश दिला होता. तसेच या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतरही शहरात १० नंतरही नागरिकांची वर्दळ असलेली पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच ‌काही ठिकाणी हॉटेलसह इतर गोष्टी १० नंतर देखील सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. 

त्यातच आज फक्त रुग्णसंख्याच नाही तर पॉझिटिव्हिटी रेट देखील वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज काही बैठकांसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे मुंबईत आहेत. त्यामुळे आणखी काही निर्बंधांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत विचार सुरु असुन चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे.  

एकूण पॉझिटिव्हिटी रेट देखील २५ टक्क्यांच्या आसपास 

पुणे जिल्ह्यात बुधवारी ( दि. १७) दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. आणि एकूण पॉझिटिव्हिटी रेट देखील २५ टक्क्यांच्या आसपास गेला आहे. इतक्या प्रमाणातील वाढ हे काळजीचे कारण बनले आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. त्यातच बुधवार आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविली गेली. बुधवारी दिवसभरात २ हजार ५८७ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ७६९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ३२ झाली आहे. 

पिंपरीतही धोका वाढला पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. निगडी प्राधिकरण, थेरगाव, सांगवी आणि भोसरी परिसरात धोका वाढला आहे. बुधवारी दिवसभरात १ हजार २४८ जण पॉझिटिव्ह सापडले होते तर दिवसभरात ६१५ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ६ हजार ३९० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार ४०७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५०६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या १ हजार ७५९ वर पोहोचली आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरcommissionerआयुक्त