शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

Corona virus Baramati: बारामतीकरांचं कोरोनाने वाढवलं टेन्शन ; १४ दिवसांत आढळले ३ हजार ३७० कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 21:28 IST

नागरिकांच्या बेपर्वाईमुळे बारामतीत चिंतेचे वातावरण

बारामती: शहर आणि तालुक्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. एप्रिल महिन्यात १४  दिवसांत आढळलेले कोरोनाबाधितांची आकडेवारी बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकविणारी आहे. आजपर्यंत शहर आणि तालुक्यात ३ हजार ३७० कोरोनाबाधित आढळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेने यंदा कोरोनाची आकडेवारी अधिक असल्याचे चित्र आहे.

बारामतीत कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने वाढत आहे.प्रशासनही लाट रोखण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहे.मात्र, काही उदासिन नागरिकांसह काही कोविड रुग्णांमुळे कोरोनाचा आलेख घसरण्याचे सध्या कोणतेही संकेत नाहीत. त्यातच रेमडेसिव्हीरचा तुटवडा दिवसेंदिवस गडद होत आहे. मागणीच्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. कोरोनाग्रस्तांची या इंजेक्शनसाठी धावाधाव सुरुच आहे. 

कालचे शासकीय (दि. १३) एकूण आरटीपीसीआर नमुने  ५१८ तपासण्यात आले.त्यापैकी एकूण बारामतीमधील १७२ रुग्ण  पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १८ आहेत.  

काल तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर त्यापैकी पॉझिटिव्ह ८४ आहेत.कालचे एकूण अँटीजन २३४ असून त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह ७४ आले आहेत.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३३० आहेत.यामध्ये शहर १७७ ग्रामीण १५३ रुग्णांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. 

कोरोना आजपर्यंतची अपडेट एकूण रूग्णसंख्या- १२ हजार ३७५एकूण बरे झालेले रुग्ण- ९ हजार ८३५ आजपर्यंत एकूण मृत्यू - १९०——————————————...एकही रेमडिसिविर इंजेक्शन आलेले नाही रेडडिसीव्हर आवक जावक वापर समन्वयक समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बुधवारी(दि १४) बारामतीत एकही रेमडिसिविर  इंजेक्शन आलेले नाही.  मेडिकल ‘अटॅच’ असणाऱ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांची सोमवारी(दि १३) बैठक घेण्यात आली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांना,त्यांच्या नातेवाईकांना मेडिकलची सोय असणाऱ्या रुग्णालयांनी रेमडिसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी घ्यावी.याबाबत  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. अन्यथा संबंधितांना प्रांत कार्यालयाकडे तक्रार करावी,असे कांबळे यांनी सांगितले.—————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटल