शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Baramati : शरद पवारांच्या काटेवाडीत १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 18:54 IST

शरद पवार यांच्या काटेवाडी गावात रुग्ण वाढत असल्याने १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

बारामती : राज्यात काही जिल्हे वगळता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.मात्र एकीकडे मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या कमी होत असतानाच ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी वाढत आहे. यामुळे प्रशासनापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मागील महिन्याभरापासून रुग्णसंख्येत घट झाली आहे. परंतु, ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रेट ९ टक्क्यांच्याजवळ आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या काटेवाडीत कोरोना रुग्ण आढळून येत आल्याने  प्रशासनाने तिथे १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

शरद पवार यांच्या काटेवाडी गावात रुग्ण वाढत असल्याने १४ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.या कालावधीत प्रशासनाने नागरिकांना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे काटेवाडी गावात शंभर टक्के लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे. मंगळवारी गावात कोरोना तपासणी चाचणी शिबीर आयोजित  करण्यात आले होते. त्यात नागरिकांची अँटिजेन टेस्ट केल्यानंतर २७ नवीन कोरोनाबाधित सापडले होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासना कडक लॉक डाउनचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात आता पर्यंत केवळ ११ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण राज्यासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली, पण सहा महिन्यांत जिल्ह्यातील केवळ ११ टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण म्हणजे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. तर ४२ टक्के लोकांनी पहिला डोस झेतला आहे.  दरम्यान केंद्र शासनाने आता पुरेशा प्रमाणात लसची डोस उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले असून, जिल्ह्यात दिवसाला दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 

१८ ते ४४ वयोगटातील केवळ एक टक्का लोकांचे लसीकरण केंद्र शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण सुरू केले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे २५ लाख ३५  हजार ४२६ लाभार्थी अपेक्षित आहेत. यापैकी ४ लाख १६ हजार ७६५ लोकांनी पहिला तर दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या केवळ २२ हजार ८८ म्हणजे एक टक्का एवढी आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार