शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Corona Virus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 04:46 IST

आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर : गर्दीच्या ठिकाणी प्रवास शक्यतो टाळा

पुणे : दुबई येथून वर्ल्ड टूर करून आलेल्या पुण्यातील दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही रुग्णांना नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी, कर्मचारी या सर्व व्यक्तींच्या तपासण्या सुरू आहेत. यापैकी कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

पुणे शहरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी तातडीने मंगळवारी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, आरोग्य विभागाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, दोन रुग्णांची तपासणी केलेली आहे. दोन्ही रुग्णांनी मागील पंधरा दिवसांत कोणकोणत्या ठिकाणी प्रवास केला त्याची माहिती घेतली आहे. हे दोन्ही रुग्ण फेबु्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला ४० जणांच्या गु्रपसोबत फिरायला गेले होते. ते १ मार्च रोजी परतले. त्या वेळी विमानतळावर तपासणी करण्यात येणाऱ्या देशांच्या यादीत दुबईचा समावेश नसल्याने त्याची तपासणी झाली नाही. या दोन्हींपैकी एका व्यक्तीला त्रास झाल्याने तिने ८ मार्च रोजी डॉक्टरकडून तपासणी करून घेतली. यावेळी त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली.रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींवर ‘वॉच’हे दोन्ही रुग्ण भारतात परत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. रुग्णांच्या कुंटुंबातील ३ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तसेच, या व्यक्ती १ मार्च रोजी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी मुंबई ते पुणे ओला टॅक्सीने प्रवास केला. या टॅक्सी ड्रायव्हरला सोमवारी रात्री नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले आहे. दोन्ही कोरोना रुग्णांसोबत दुबई येथे गेलेल्या राज्यातील अन्य ४० व्यक्तींची नावे व संपर्क क्रमांक असलेली यादी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना