शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Corona virus : पुणे विभागात ८११ नवे कोरोनाबाधित रूग्ण ; ३१ जणांचा मृत्यू    

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 20:42 IST

विभागात १४ हजार ४४५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले..

पुणे: पुणे विभागात ८११ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून विभागातील बाधित रुग्णांची संख्या २३ हजार ९७० झाली आहे. तसेच शनिवारी ३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या विभागातील एकूण रूग्णांची संख्या ९९० वर पोहचली आहे. विभागात १४ हजार ४४५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या ८ हजार ५३५ रुग्ण आहे.तसेच ४९६ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.पुणे विभागात ८११ बाधित रूग्ण अढळून आले असून त्यात पुणे ७४७, सातारा जिल्ह्यातील २९, सोलापूरमधील १०, सांगली जिल्'ातील ६ तर कोल्हापूर मधील १९ रूग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या विभागातील एकूण रूग्णांची संख्या ९५९ होती. शनिवारी ३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या विभागातील एकूण रूग्णांची संख्या ९९० झाली आहे. पुणे जिल्हयात १९ हजार ५८७ बाधीत रुग्ण असून ११ हजार ३७५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्'ात ७ हजार ५३२ अ‍ॅक्टिव्ह  रुग्ण असून जिल्ह्यात एकूण ६८० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ३८१रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण ५८.०७ टक्के आहे.तर मृत्यूचे प्रमाण ३.४७ टक्के इतके आहे.सातारा जिल्हयातील कोरोना बाधित ९१७ रुग्ण असून ६८९ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या १८९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ४२ बाधित रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात २ हजार ३५० कोरोना बाधित रुग्ण असून जिल्'ातील १ हजार ४६२ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सोलापूरमध्ये ६४० अ­ॅक्टीव रुग्ण असून आत्तापर्यंत एकूण २४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   सांगली जिल्हयात ३१९ कोरोना बाधित रुग्ण असून २०७ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या सांगलीत १०२ अ‍ॅक्टिव्ह  ­ रुग्ण असून आत्तापर्यंत एकूण १० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात ७९७ कोरोना बाधित रुग्ण असून ७१२ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.जिल्ह्यात ७५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण १० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागात एकूण १ लाख ६० हजार ७१७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ५८ हजार ७८५नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ९३२ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १ लाख ३४ हजार ४८७ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून २३ हजार ९७० नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तhospitalहॉस्पिटल