शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus : खेड तालुक्यात मंगळवारी दिवसभरात ७ रुग्ण कोरोनाग्रस्त, तालुक्यातील रुग्णांची संख्या १५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 19:53 IST

राजगुरुनगरकरांना ही धोक्याची घंटा असून 'कोरोना दारात तरीही माणसं बसेना घरात' असे म्हणण्याची वेळ आता आली आहे

ठळक मुद्देकोरोनाचा पादुर्भाव राजगुरूनगर शहर व ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

राजगुरुनगर...खेड तालुक्यात मंगळवारी ७ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे.तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १५ वरती पोहचली आहे. कोरोनाचा पादुर्भाव राजगुरूनगर शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.चास येथील पापळवाडी येथे काही दिवसापुर्वी मुंबईहून आलेला व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राक्षेवाडी ५, चाकण १, वडगाव पाटोळे १, पापळवाडी १ असे तालुक्यात कोरोनाग्रस्त आढळून आले होते.. त्याच बरोबर त्यांच्या संर्पकात आलेले तसेच मुंबई येथुन आलेले वडगाव पाटोळे येथील ३ रुग्ण, मुंबईवरून कडुस येथे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले ३ व्यक्ती, तसेच कुरकुंडी यथे ३ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५ झाली आहे. त्यामध्ये एका १० वर्षीय मुलांचा समावेश असल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले. तसेच चाकण येथील खराबवाडी येथे कंपनीत काम करणारा व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी येथुन खराबवाडी येथे कामास येत होता. तालुक्यात मुंबईवरून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ नागरिकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.तालुक्यात राक्षेवाडी हा कंटेनमेंट झोन वगळता शहरातील काही उद्योग व्यवसाय वरील निर्बंध उठवण्यात आले आहे. या निर्णयाने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परंतु नागरिक नियमाचे पालन कमी आणि उल्लंघन जास्त करू लागले आहेत. कंटेन्मेंट झोन नावाला उरला असून इथे प्रत्येकजण निर्धास्तपणे वावरू लागला आहे. राजगुरुनगरकरांना ही धोक्याची घंटा असून कोरोना दारात तरीही माणसं बसेना घरात असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. तालुक्यात कोणाचा पादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसात आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज पुन्हा ७ रुग्ण सापडले आहे. त्यामुळे. आरोग्य यंत्रणेची अक्षरश: झोप उडाली आहे. 

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम