शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पुणे शहरात सोमवारी २१४ तर पिंपरीत १५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 23:35 IST

पुणे शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ९ हजार १९८; सध्या १ हजार ७०३ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू..

ठळक मुद्देपुणे शहरातील एकूण चाचणीची संख्या ही ७ लाख ३ हजार ६२१ इ

पुणे/पिंपरी : पुणे शहरात सोमवारी केवळ २१४ कोरोनाबाधिताची वाढ झाली आहे.गेल्या चार-पाच महिन्यात प्रथमच कोरोनाबाधितांची एवढी कमी वाढ शहरात दिसून आली आहे. आज दिवसभरात ५०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत.    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवभरात १ हजार ४९७  जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, शहरातील एकूण चाचणीची संख्या ही ७ लाख ३ हजार ६२१ इतकी झाली आहे.     शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये सध्या ७९९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४३४ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत़  तर २ हजार १६७  रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.      शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ९ हजार १९८ इतकी असून, आत्तापर्यंत १ लाख ४४ हजार ४३२ जण कोरोनामुक्त झालेले आहेत.----------------------------------पिंपरीत १५९ नवे कोरोनाबाधित; ४१४ जण कोरोनामुक्तपिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होत असून शहराच्या विविध भागातील १५९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुक्तांची संख्या दुपटीने होऊ लागली आहे. गेल्या वीस दिवसांपासून कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील महापालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये  सध्या १ हजार ७०३  सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या अडीशेपर्यंत खाली आली आहे. शहरात आजपर्यंत ८५ हजार ६७७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ................................... आठ जणांचा मृत्यू शहरातील ८ आणि पालिका हद्दीबाहेरील ४ अशा १२ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. मृतांमध्ये ज्येष्ठांचा समोवश अधिक आहे. शहरातील ७ पुरूष आणि १ महिला आणि शहराबाहेरील १ पुरूष आणि १ महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे.  त्यामुळे शहरातील मृतांची संख्या १ हजार ४८५ वर पोहोचली आहेत. ....................  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल