शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: पुणे शहरात गुरुवारी २ हजार ९०२ तर पिंपरीत २ हजार ५१८ नवे कोरोना पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 21:01 IST

पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५८२ झाली आहे. 

ठळक मुद्देपुणे शहरात गुरुवारी २,९८६ रुग्ण झाले बरे : १,४१४ अत्यवस्थ, ६६ मृत्यू 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ सुरू असली तरी सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी दिवसभरात २ हजार ९०२ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात २ हजार ९८६ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४१४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ५७१रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार १८४ झाली आहे. पुण्याबाहेरील २० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण २ हजार ९८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ लाख ९२ हजार ४८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ३९ हजार २५१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३९ हजार ५८२ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १८ हजार ८६२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख २९ हजार १०० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

.... दिलासादायक! लसीकरण वाढीबरोबरच निगेटिव्ह अहवालांचे प्रमाण वाढले

पिंपरी :  कोरोनाचा आलेख कालपेक्षा चारशेंनी वाढला आहे. तसाचा कोरोमुक्तांचा आलेख कमी झाला आहे. मात्र, निगेटिव्ह येणाºया नागरिकांची संख्या वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. २५१८ जण पॉझिटिव्ह आढळले असून १३१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  दाखल रुग्णांची संख्याही कमी होत आहे.  लसीकरणातही वाढ झाली आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात  कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २१०० वर आलेली रुग्णसंख्या आज चारशेंनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ९  हजार ९६३ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ६ हजार ६८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ हजार ७२८  जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ८४५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ८ हजार ७३५   जणांना डिस्चार्ज दिला आहे.............................कोरोनामुक्तही झाले कमी            कोरोनामुक्त रुग्णांचा वाढलेला आलेख कमी झाला आहे. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ९६० वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख  २३ हजार ९६६ वर गेली आहे...................................

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त