शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७८९ नवीन कोरोनाबाधित; ४६ रुग्णांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 21:11 IST

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३०७ झाली आहे. 

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २१३ आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १५ हजार २९८

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात १७८९ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३०७ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार २१३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १५ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २१३ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ५१२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १५ हजार २९८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ८१८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ३०७ झाली आहे.

 ------------- 

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ४६३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ८९ हजार ३०९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.  

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका