शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : पुण्यात लसीकरणापासून ‘विशेष’ मुले उपेक्षितच; मुलांची काळजी घेण्याचा ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 18:25 IST

लस देण्याची पालकांसह संस्थांची मागणी

पुणे : देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्ससोबत लस देण्याची अनुमती देण्यात आली आहे. लसीकरणाची केंद्रही वाढविण्यात येत आहेत. परंतु, लसीकरणाच्या या घाईगडबडीत ‘विशेष मुले’ (गतीमंद) दुर्लक्षित राहिली आहेत. कोरोनामुळे त्यांच्या काळजीचा ताण वाढला असून त्यांना लस तात्काळ लस देण्याची मागणी पालक आणि स्वयंसेवी संस्थांकडून केली जाऊ लागली आहे. 

कोरोना काळात रुग्णसंख्या जसजशी वाढत गेली तसतसे कोविड केअर सेंटर वाढविण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये आजवर दोन लाखांच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याकाळात गतीमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याची यंत्रणा नव्हती. ती यथावकाश शहरात सुरु करण्यात आली. कोंढव्यातील सिंहगड कॉलेज सेंटरमध्ये या विशेष मुलांवर उपचार करण्यात आले. सुदैवाने सर्व मुले सुरक्षित बरी झाली. 

या काळात सर्वाधिक ताण मुलांच्या पालकांवर आणि विशेष मुलांच्या संस्थांवर होता. कोरोनाला दूर ठेवण्याकरिता आवश्यक असलेल्या मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राखणे या नियमांचा जिथे सर्वसामान्य नागरिकांना विसर पडला आहे; तिथे या विशेष मुलांची तर गोष्टच वेगळी. या मुलांना मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे किंवा सुरक्षित अंतर राखण्याचे भान राहात नाही. ही मुले स्वच्छंदीपणाने वागत असतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक आहे. 

पालकांना सतत मुलांच्या मागे जावे लागते. त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. त्यातच या मुलांसाठी काम करणा-या विविध संस्थांनांही अधिक खबरदारी बाळगावी लागत आहे. त्यामुळे काही संस्थांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्रिय मंत्र्यांकडे पत्र देऊन या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. ====माझा मुलगा गतीमंद आहे. त्याला स्वत:चे काहीही करता येत नाही. कोरोनाकाळात त्याची सतत काळजी लागून राहते. ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्तांना लस दिली जात आहे. मग, या मुलांना लस का उपलब्ध करुन दिली जात नाही. त्यांच्या वागण्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांना लसीची अधिक आवश्यकता आहे. शासनाने याचा विचार करुन विशेष मुलांसाठी तात्काळ लस उपलब्ध करुन द्यावी. - एकनाथ ढोले, पालक====विशेष मुलांच्या संस्थांमध्ये शेकडो मुले राहत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि काळजी घेणे पुर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे. या मुलांना मास्क वापरणे, सतत हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतराबाबत भान नसते. त्यांना त्याबाबत आग्रह केला तर चिडचिड होते. त्यांना प्राथमिकता देऊन लस उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आम्ही केंद्रिय मंत्री, जिल्हा परिषद, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासोबतच त्यांचे पालक आणि काळजीवाहक यांनाही फ्रंटलाईन वर्कर म्हणून लस दिली जावी अशी आमची मागणी आहे. - निलीमा देसाई, नवक्षितीज संस्था

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका