शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! कोविशिल्ड,कोव्हॅक्सिननंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' लस पुण्यात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 16:05 IST

स्पुतनिक व्ही लसीला भारतासह एकूण ५५ देशांमध्ये वापरासाठी मान्यता मिळाली आहे.

पुणे:  कोविशिल्ड,कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' (Sputnik V) ही लस पुण्यात वापरासाठी दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ६०० डोस पुणेकरांसाठी उपलब्ध झाले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीच्या एका डोसची किंमत ११४२ रुपये इतकी असणार आहे. लस  स्पुतनिक व्ही लस पुणेकरांना २८ जूनपासून दिली जाणार आहे.या लसीच्या डोससाठी कोविन अ‍ॅप व पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे राहणार आहे.

मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली असून हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून रशियाची स्पुतनिक व्ही लसीचे भारतातील वितरण सुरु आहे.राज्यातील व पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात स्पुतनिक व्ही लसीचा पहिला डोस काही दिवसांपूर्वी डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीजच्या ३६ वर्षीय व्यक्तीला देण्यात आला होता अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मागील सहा महिन्यांपासून कोरोना लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. मध्यंतरी लसींच्या तुटवड्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली होती.मात्र, मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्याने लसीकरणं मोहिमेला चांगली गती मिळाली आहे.

कोविशील्ड, कोव्हॅक्सिससह 'स्पुतनिक व्ही' या लसीच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर स्पुतनिक व्ही लसीचा दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यायचा आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा उपयोग करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला भारतासह एकूण ५५ देशांमध्ये वापरासाठी मान्यता मिळाली आहे. भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या लसीमुळे नागरिकांना लसीकरणासाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. स्पुतनिक व्ही लसीमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे.कोरोनाविरुद्ध स्पुतनिक व्ही लस ९२ टक्के प्रभावी आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल