शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र शनिवारीही राहणार बंदच; लवकरच मार्ग निघेल, महापौरांचा विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 21:36 IST

‘सिरम’चीही पुण्याला लस देण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पुणे: राज्य सरकारकडूनपुणे महापालिकेला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कोरोना लसींचा पुरवठा न झाल्यामुळे शनिवारी देखील (दि. २२) शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 

राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, शहरात धडाक्यात कोरोना लसीकरण सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून लसींचा पुरवठा करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून पुणेकरांच्या लसीकरणाची मोहीम रखडली आहे.

गेल्या शनिवारपासून तीन दिवस पुणे शहरातील लसीकरण बंद होते. मात्र मंगळवारी रात्री राज्य सरकारकडून काही प्रमाणात लसी प्राप्त झाल्यानंतर बुधवारी शहरातील ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लसींचा पुरवठा प्राप्त न झाल्याने शुक्रवारी(दि.२१) पुन्हा एकदा पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंदच होते. सरकारकडून शुक्रवारी तरी पुणे महापालिकेला काही लसींचा लसी प्राप्त होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.परंतू, लसी मिळाल्या नाही त्यामुळे शनिवारी सुद्धा पुणे शहरातील लसीकरण केंद्र बंद ठरवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट’कडे लस मिळविण्यासाठी गेली दोन आठवडे मी स्वतः बैठका घेऊन पाठपुरावा करत आहे. ‘सिरम’चीही पुण्याला लस देण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारशीही माझा पत्रव्यवहार सुरु आहे. यावर लवकर मार्ग निघेल, हा विश्वास वाटतो. पुणेकरांना शक्य तितक्या कमी वेळात अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये प्रत्यक्ष जाऊन चर्चाही केलेली आहे.

लसीकरण केंद्र सुरु झाल्यावर यांना मिळणार प्राधान्य...  लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रथम दिव्यांग नागरिक, दुसऱ्या डोसचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक व त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेले पहिल्या डोसचे लाभार्थी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ऑनस्पॉट नोंदणीसाठी आलेल्या पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरState Governmentराज्य सरकारCorona vaccineकोरोनाची लस