शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : पुणे,पिंपरीमधील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात धाव; आरोग्य केंद्रावर एकच गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 22:38 IST

शहरातील नागरिकांनी लसीकरणासाठी गावाकडे गर्दी केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गोंधळ ....

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५५ हजार लसीकरण डोस उपलब्ध झाल्याची बातमी पसरताच बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडे धाव घेतली. शहरामधून नागरिकांची वाहने लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. गावकऱ्यांनी अशा पद्धतीच्या लसीकरणावर आक्षेप नोंदवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लसीकरण डोसचा तुटवडा निर्माण झाल्याने लोक लसीकरणासाठी या सेंटर वरून त्या सेंटरवर वणवण फिरत आहेत. कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण सुरू झाले आहे. या गटातील लसीकरणासाठी नोंदणी करून उपलब्ध लसीकरणाचे ठिकाण नागरिकांना निश्चित करून दिली जाते. गेल्या दोन दिवसापासून या वयोगटातील लसीकरणाच्या मोहिमेसाठी होणाऱ्या नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने एक-दोन मिनीटातच कोठा पूर्ण होतो अशी स्थिती आहे.

कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी 18 ते 44 हा वयोगट उत्साही असल्याने ज्या केंद्रावर लसीकरणासाठी नोंदणी मिळेल त्या केंद्रावर जाऊन लसीकरण करण्याची या गटाची तयारी आहे. बुधवारी (दि.5) रोजी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक नागरिकांनी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राची निवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील जुन्नर वेल्हे मुळशी खेड शिरूर बोर पुरंदर या तालुक्यातील लसीकरण केंद्रावर पुण्यातील नागरिकांची गर्दी उसळली. त्यास ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. परंतु लसीकरणासाठी नाव नोंदणी आणि केंद्र निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला असल्याने ठरलेल्या नोंदणी नुसार लसीकरण करण्यात आले.

18 ते 40 वयोगटातील लसीकरण आतील नोंदणी अगोदर झाल्याने काही तासातच लसीकरणाचा कोटा पूर्ण झाला दुपारनंतर ही केंद्र बंद करण्यात आली. ग्रामीण भागातील या गटातील नागरिकांना लस न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. ग्रामीण भागातील केंद्रही ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरू ठेवावीत आणि शहरातील केंद्रांवर शहर आणि परिसरातील नागरिकांना तर लसीकरण करावे म्हणजे गोंधळ होणार नाही अशी भूमिका अनेक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांकडे व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड