शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Baramati: उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेचे वाजले तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:23 IST

नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी यशस्वी झाल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन.....

बारामती: लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बारामतीत लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजले आहे.सोमवारी बराच वेळ थांबूनही लस न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. लसीकरण केंद्रावर हे चित्र नित्याचेच झाले आहे. पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्याची वेळ आली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी केवळ महिला रुग्णालयात आणि ग्रामीण भागात होळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ या दोनच ठिकाणी प्रत्येकी १०० नागरिकांना लस दिवसाला मिळणार आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, नागरिकांनी लसीकरण करण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी ग्राह्य धरली जाते.या वयोगटासाठी ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ची सोय नाही ऑनलाईन नोंदणी (ओपन)सुरु झाल्यावर अवघ्या चार ते पाच मिनिटात १०० जणांची नोंदणी पूर्ण होते. ही नोंदणी पूर्ण झाल्यावर पुढील नोंदणी अ‍ॅपवर घेतली जात नाही.अ‍ॅपवर नोंदणी झालेल्या १०० जणांची यादी आरोग्य विभागाला पाठविण्यात येते.त्यानंतर त्याच १०० जणांना लसीकरण करण्यात येते. ही यादी रुग्णालयाबाहेर रोज लावण्यात येते. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी यशस्वी झाल्याचा अनेकांना ‘मेसेज’ येतो. मात्र,याच ठिकाणी अनेकांची गोंधळ होते. नोंदणी करणाऱ्यांना दिवस आणि तारीख मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा ‘स्लॉट’ मिळाल्यानंतरच सबंधितांनी लसीकरणासाठी यावे.

४५ वर्ष वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी आलेली लस ३६ लसीकरण केंद्रांमध्ये विभागुन देण्यात येते. खासगी लसीकरण केंद्रांला सध्या लस पुरविणे शक्य नाही.

प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लसीकरण करण्यात येत आहे. तसेच ७० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना,तर ३० टक्के प्रथम डोस घेणाऱ्या ४५ वर्षापुढील नागरिकांना देण्यात येत आहे. यामध्ये देखील आॅनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना लसीकरणास प्राधान्य देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. दुसऱ्या डोससाठी नागरिकांना ऑनलाईनची गरज नाही,त्यांनी पहिल्या डोसच्या वेळीच नोंदणी केली आहे. त्यामुळे महिला रुग्णालयात सकाळी ९ वाजता पहिल्या ७० नागरिकांना टोकन देण्यात येते.मात्र, यावेळी संख्या अधिक असल्याने वाद होतात.

नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी यशस्वी झाल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये,असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.दुसरा डोस पूर्ण केल्याशिवाय पुढील लसींचा पुरवठा केला जाणार नसल्याची केंद्र सरकारने सूचना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. ———————————————...यामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा धोकासोमवारी चार तास रांगेत थांबलेल्या स्मिता पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले ,मी पहिली लस खासगी रुग्णालयात घेतली आहे.मात्र, लस नसल्याने ते केंंद्र बंद आहे.त्यामुळे दुसऱ्या डोससाठी शासकीय रुग्णालयात यावे लागले.  मात्र,या ठिकाणी लसीकरण प्रक्रियेबाबत कोणीही माहिती दिली नाही. नियोजन नसल्याने मोठी गर्दी होते.यामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार