शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ‘अनलॉक’नंतर रस्त्यावर नागरिकांची कोरोना तपासणी; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 18:30 IST

पोलीस प्रशासनाचा पुढाकार सर्वांचेच अहवाल मिळाले ‘निगेटिव्ह’

बारामती : मंगळवार (दि. ८) पासून बारामतीचा ‘अनलॉक’च्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना त्यांची दुकाने ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने गुरुवारी (दि. १० ) घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक तपासणी केली. यावेळी १८० जणांच्या अँटिजेन कोविड तपासण्या करण्यात आल्या. सुदैवाने सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवरक यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार वैद्यकीय विभागाच्या मदतीने गुरुवारपासून बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सम्यक चौक,इंदापूर चौक याठिकाणी तपासण्या  करण्यात आल्या. सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी(दि ९) बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी (काऱ्हाटी) व खराडेवाडी येथे अँंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण २४३ संशयितांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २४ हजार ८३६ झालेली आहे.तसेच गेल्या २४ तासात एकूण आरीटीपीसीआर १८८ नमुने तपासण्यात आले. यामध्ये बारामतीमधील पॉझिटिव्ह-२८ आले आहे. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२ आहेत. म्युकर मायकोसिसचे एकूण रुग्ण- २२ पैकी बारामती तालुक्यातील- १५ इतर तालुक्यातील- ७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान काल दिवसभरातील रुग्णसंख्या ३७+ २० = ५७ झाली आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.

ज्या नागरिकांचा दुसरा डोस (कोविशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे. अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे डॉ.खोमणे यांनी सांगितले.—————————————————...दुकानांचे मालक,कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणीबारामती नगर परिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग यांनी गुरुवारी संयुक्तपणे शहरातील दुकानातील मालक व कर्मचारी यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोग होणार आहे. आज विविध दुकानांमध्ये  एकुण १०० तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये एकही कोरोना बाधित आढळला नसल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार