शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना करतोय तरुणांना टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 13:27 IST

२२ ते ३९ वयोगटातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

ठळक मुद्देतरुणांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना मृत्यूचा धोका कमी

पिंपरी - चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. शहरातील तरुण वयोगटाला सर्वाधिक लागण होत असल्याची स्थिती आहे. आता पर्यँत २२ ते ३९ या वयोगटातील ४१ टक्के नागरिकांना लागण झाली  आहे. त्यामुळे तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

या वयोगटातील नागरिकांना मध्ये लक्षण विरहित रुग्णांचे प्रमाण हे जास्त आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही यांच्यामुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षण विरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण जास्त आहेत. परंतु अशा रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे येत दिसून आहे. 

गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ही संसर्ग होण्याचा धोका आहे. तरुण वयोगटातील नागरिक कामानिमित्त, नोकरीसाठी सर्वाधिक वेळ बाहेर असतात. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक लागण होत आहे. यांच्या माध्यमातून यांच्या परिवारातील व्यक्तींना लागण होते. अनेक तरुण मास्क घालत नसल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. तरुणांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना मृत्यूचा धोका कमी असतो. कोरोनामुळे मृत्यू होणाचे प्रमाण हे ५५ वर्षांपुढील रुग्णांचे जास्त आहे. सध्या वाढत असलेला कोरोना तरुणांना टार्गेट करत असल्याने तरुणांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

मृत्यू होण्यात ज्येष्ठांचे प्रमाण अधिक 

कोरोनाची सर्वाधिक लागण ही तरुणांना होत असली. तरीही मृत्यू  होण्यामध्ये ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे अधिक आहे. शहरात आता पर्यँत १९४३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांनाच जीव गमवावा लागला आहे. 

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे लक्षणे दिल्यास महापालिका केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी. कोरोना काळात ठेऊन दिलेल्या नियमांचे पालन करावे. यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. असे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले आहे. 

वयोगटानुसार आता पर्यँत झालेली लागण 

० -१२ : ८६१२ १३ - २१ : १००१९ २२- ३९ : ५१५०३४०- ५९ : ३८२३२ ६० पेक्षा जास्त : १७१२९

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या