शनिवार व रविवारी फक्त जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली, इतर दुकाने बंद करण्यात आली. सासवडचा आठवडा बाजार सोमवारी असतो. बाजाराला परवानगी नाही तरी बाजार भरलेला दिसतो. मास्क लावणे, गर्दी टाळणे याकडे दुर्लक्ष होत आहे नागरिक शिस्त पाळताना दिसत नाहीत. हॉटेल, ढाबे सुरूच आहेत यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण कमी झाल्याशिवाय सवलत मिळणार नाही, याची जाणीव नागरिक दुकानदार यांनी ठेवावी अशी प्रशासनाची इच्छा आहे. १५ जून रोजी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात २४ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट १९ जून रोजी आला. त्यामध्ये १८ जण पॉझिटिव्ह आढळले. जेजुरी ग्रामीण रुग्णालयात ८१ नागरिकांची तपासणी झाली. त्यामध्ये ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अशाप्रकारची रुग्णवाढ झाली तर सवलत मिळणार नाही याची जाणीव नागरिकांनी ठेवणे
गरजेचे आहे.
दिनांक २० जून रोजी तालुक्यात ३८६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये बेलसर ८१, माळशिरस ५२, नीरा ६३ परीचे ८६,वाल्हा १८, जेजुरी ३१ ,सासवड ५५ याचा समावेश आहे. २१ रोजी तालुक्यातील १८ ते ४४ वयोगटांतील दिव्यांग बांधवांचे लसीकरण होणार आहे. कोविशिल्ड लस दुसऱ्या डोससाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपलब्ध असून उपलब्धतेनुसार लाभार्थींना डोससाठी कळविले जाईल. पुरंदर तालुक्यामध्ये एकूण ६८हजारी ७६ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.