शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाला ११ कोटींचा फटका; उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 19:52 IST

वर्षभरात नियोजित उपक्रमांना बसला ब्रेक

पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागाला यंदा कोरोनाचा फटका बसला असून तब्बल 11 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. प्राणी संग्रहालये, उद्याने, प्रदर्शने बंद असल्याने विभागाचे उत्पन्न बुडाले असून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यास आणखी फटका बसू शकतो.

पालिकेच्या उद्यान विभागाचे शहरात कात्रज प्राणी संग्रहालये, 200 पेक्षा अधिक उद्याने आहेत. मार्चमध्ये जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरु होते, तेव्हाच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्व उद्याने आणि प्राणी संग्रहालये बंद करण्यात आली. आताशा उद्याने निर्बंधांसह सुरु झाली आहेत. उद्यानांमध्येही व्यायाम, खेळ आदींना बंदी घालण्यात आली आहे. केवळ चालण्याकरिता उद्यानांचा वापर करण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यातच कोरोना पुन्हा वाढू लागल्याने ही उद्याने पुन्हा बंद करावी लागतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

उद्यान विभागाकडून दरवर्षी फळे-फुले-भाजीपाला महोत्सव आयोजित केला जातो. यासोबतच जून ते आॅगस्टदरम्यान वन महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात अल्पदरात रोप विक्री केली जाते. जवळपास 35 ते 40 हजार रोपांची विक्री या महोत्सवामध्ये केली जाते.  यासोबतच दिवाळीमध्ये किल्ले प्रदर्शन, जागतिक पर्यावरण दिन, वन्य प्राणी सप्ताह आदी उपक्रम राबविले जातात. यामधूनही उद्यान विभागाला 11 ते 12 कोटींचा महसूल मिळत असतो. परंतू, मागील 11 महिन्यांपासून कोरोनामुळे उद्याने आणि सर्व उपक्रम बंद असल्याने यंदा एक कोटीचेही उत्पन्न मिळालेले नसल्याचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालय