शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 11:39 IST

मागील दीड वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तूट आली आहे.

ठळक मुद्देबारामती येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन 

बारामती : राज्याच्या तिजोरीमध्ये दरवर्षी साडेचार लाख कोटीं रूपये जमा होत असतात. मागील दीड वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तूट आली आहे. परिणामी विकासकामांसाठी निधीची मोठ्याप्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार वेगवेगळया प्रकल्पांसाठी योजना राबवून निधी देत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन शनिवारी (दि. २८) बारामती कृषि उत्पन्न बजार समितीच्या जळोची उपबाजारामध्ये पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये फलोत्पादन योजना राबवण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात हीच योजना पवार साहेबांनी राष्ट्रीय पातळीवर नेली. त्याचा परिणाम म्हणजे राज्यासह देशात फळांच्या उत्पादनात वाढ झाली. बारमाही फळे उपलब्ध झाली. मात्र कृषीमुल्य साखळीच्या टप्प्यात ४० टक्के तर शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमध्ये अजुनही फळे, भाजीपाला यांचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात मॅग्नेट प्रकल्पाव्दारे महाराष्ट्रामध्ये सुमारे १ हजार 100 कोटीची कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हा पहिला प्रकल्प बारामतीमध्ये उभारण्यात आला आहे.

तत्पूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले, देशातील फळे निर्यातीमध्ये राज्यातील शेतकºयांचा वाटा मोठा आहे. डाळींब, केळी , संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी,  मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके आदींना जागतिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. काढणीपश्चात शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जागतिक बाजारपेठेतील चांगल्या दराचा फायदा येथील शेतकºयांना व्हावा या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यावेळी सहकार व पणन  प्रधान सचिव अनुप कुमार, कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक व मॅग्नेटचे प्रकल्प संचालक   दिपक शिंदे, सभापती समिती  वसंत गावडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. ------------------------

बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, सिएनजी सेंटर  उभे करण्यात येत आहे. जेणेकरून बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा उद्देश आहे. तसेच सुपे येथे देखील नव्याने बाजार समितीच्या अंतर्गत पेट्रोेलपंप उभारण्यात येत आहे. तर जळोची येथील जनावरे बाजार पुढील काळात तालुक्यातील झारगडवाडी येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी २५ एकर जारा घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ---------------------------यापुढे राज्य सरकार डिझेलवर चालणाऱ्या एसटी बस घेणार नाही. सध्या इंधन टंचाईचे मोठे संकट एसटीवर आहे. त्यासाठी सीएनजी चालणाऱ्या इलेक्ट्रीक बस राज्य सरकार टप्प्याटप्प्याने घेणार आहे. एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पैैसे नव्हते. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५०० कोटी रूपये दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. --------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या