शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 21:49 IST

कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताज महालाचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे.

ठळक मुद्देडॉ. डी. एन. यादव यांचे मोलाचे योगदान संरक्षण दलाच्या जतन आणि संशोधन केंद्रात होणार संवर्धन 

पुणे : भारतातील सर्वसामान्य माणसापासून ते जगप्रसिध्द व्यक्तींपर्यंत सर्वांच्या मनात जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताज महालाने आगळी वेगळी अशी खास ‘जागा’ निर्माण केली आहे. या ऐतिहासिक वास्तूचा मोह भल्याभल्यांना झाला. कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतिक असलेली या वास्तूचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे. कारण ताज महालाच्या मालकी हक्काविषयी हस्तांतरणासंदर्भातील ऐतिहासिक दस्ताऐवज पुण्याकडे उपलब्ध झाली आहे. यामध्ये ऐतिहासिक वास्तूचे मालकी हक्क सैन्यदल की नागरी प्रशासनाकडे असावे या संदर्भातील पत्र व्यवहार झालेले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या प्रयत्नातून ही प्रत मिळणार असून खडकीच्या संरक्षण दलातर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या जतन आणि संशोधन केंद्रात (ए.यु. अ‍ॅन्ड आर. सी.) ही प्रत संग्रहित करण्यात येणार आहे. मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताज महालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता. तब्बल दोनशे पन्नास वर्षे ताजमहाल त्यांच्या नियंत्रणाखाली होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ताज महालाचा मालकी हक्क भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता. दरम्यान ताजमहाल हा सैन्याच्या ताब्यात असावा,की नगरी प्रशासनाकडे यासंदर्भात कंपनीचे अधिकारी कर्नल क्लेअर यांनी स्थानिक प्रशासनाकडे पत्र लिहले होते. ब्रिटिशांकडून मालकी हक्क मिळाल्यानंतर ताज महालाचे जतन करण्याची जबाबदारी भारत सरकारतर्फे पुरातत्व खात्याकडे सोपविण्यात आली होती. .........................ऐतिहासिक वारसा या विषयाबाबत माझ्या मनात प्रचंड आवड आणि कुतुहल आहे. ताजमहाल विषयीचे कागदपत्रांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे ताजमहालाच्या हक्काबाबतच्या कागदपत्राची एक प्रत स्वत:जवळ असावी असे मनोमन वाटत होते. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. एक प्रत माझ्याकडे ठेवली. या कागदपत्राची मूळ प्रत दिल्ली येथील कार्यालयात आहे. पुण्यातील केंद्रातही या कागदपत्राचे जतन व्हावे, अशी ईच्छा होती. त्यामुळेच हे कागदपत्र जतन केंद्राकडे सोपविले. या पत्रव्यवहारांमधून इंग्रज अधिकाऱ्यांची इतिहासातील वारसास्थळांप्रतीची आत्मीयता दिसून येते. डॉ. डी. एन. यादव 

टॅग्स :PuneपुणेTaj Mahalताजमहालpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डIndian Armyभारतीय जवान