शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जी सॅट-७ च्या यशस्वी उड्डाणात वालचंदनगरचा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 23:59 IST

महत्त्वाची उपकरणे बनविली

रेडणी : भारतीय अवकाश संस्थेच्या (इस्रो) जी सॅट-७ ए या उपग्रहाने बुधवारी (दि. १९) यशस्वी उड्डाण केले. हा लष्कराचा ३९वा दळणवळण उपग्रह आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. या उपग्रहामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग असून, वालचंदनगर कंपनीने आपल्या नावलौकिकास साजेशी कामगिरी बजावली असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी जी. के. पिल्लई यांनी दिली.

या उपग्रहामध्ये ४ सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यातून जवळपास ३.३ किलोवॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. या मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीने रॉकेटच्या मोटर, केसिंग, हेड अँड सेगमेंट, नोझल अँड सेगमेंट ही महत्त्वाची उपकरणे तयार केली असून त्याचा उपयोग मोहिमेच्या पहिल्या स्टेजमध्ये केला जातो. वालचंदनगर कंपनी गेल्या चार दशकांपासून अवकाश यानासंदर्भात महत्त्वाची उपकरणे तयार करीत असून चांद्रयान, मंगळयान या मोहिमांमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे.कंपनी बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून पूर्ण कार्यक्षमतेने देशाच्या मिसाईल, डिफेन्स व एरोस्पेस या विभागांसाठी कार्य करीत असल्याची माहिती जी. के. पिल्लई यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे