पुणे : राज्यात आलेले अवकाळी पावसाचे ढग शनिवारीही कायम होते. मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली नाही. मात्र ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. सर्वच शहरांचे कमाल व किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे.शनिवारी राज्यात सर्वात कमी ११.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १५ अंशाच्या वर गेलेले होते. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीचा हवेतील गारवाच गायब झाल्याचे चित्र आहे. पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)प्रमुख शहरांमधील किमान तापमान(अंश सेल्सिअसमध्ये)पुणे १४.९, अहमदनगर १५,जळगाव १५.५, कोल्हापूर १८, महाबळेश्वर १३.८, मालेगाव १५.८, नाशिक १४.२, सांगली १६.६,सातारा १२.९, सोलापूर १८.१,मुंबई २१, अलिबाग १८.८, रत्नागिरी १८.२, डहाणू १८.१, भिरा १६.१, उस्मानाबाद १४.६, औरंगाबाद १७.३, परभणी १६.६, नांदेड १४,अकोला १९, अमरावती १७.४, बुलडाणा १६.५, ब्रम्हपुरी १५.९, चंद्रपूर ११.८, नागपूर १५.४, वाशिम १८.४, वर्धा १६.७, यवतमाळ १६.२
राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग कायम
By admin | Updated: January 25, 2015 01:27 IST