शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रंगणार अखंड घुंगरु नाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:23 IST

गुरु रोहिणी भाटे यांच्यामध्ये कल्पनाशक्ती,सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथककलेला भाषा सौंदर्याची जोड दिली.

ठळक मुद्देरोहिणी भाटे यांना ९४ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी घुंगरू नाद कार्यक्रम आयोजन १४ व १५ नोव्हेंबर रोजी घुंगरु नाद रंगणार

पुणे : गुरु रोहिणी भाटे यांच्यामध्ये कल्पनाशक्ती,सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथककलेला भाषा सौंदर्याची जोड दिली आणि कथक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत त्याला लोकमान्यता मिळवून दिली. रोहिणी भाटे यांना अखंड घुंगरू नादातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. नादरूप संस्थेच्या कार्यालयात सलग बारा तास घुंगरू नाद करण्यात येईल. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत कथक गुरु शमा भाटे, मनिषा साठे, भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर व नादरूप संस्थेतील नृत्यांगना घुंगरू नाद करत आदरांजली वाहतील. कथक या नृत्यप्रकारासाठी आयुष्य वेचण्याबरोबरच त्या परंपरेचा धागा जपत कथकमध्ये सर्जनशील प्रयोग करणा-या गुरु रोहिणी भाटे यांना त्यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी नादरूप कथक संस्था, महाराष्ट्र कल्चर सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने बुधवार १४ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर रोजी अखंड घुंगरू नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी सलग बारा तास घुंगरु नाद रंगणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी ९ पासून सायंकाळी ७.३० दरम्यान कथक नृत्याच्या माध्यमातून देशभरातील कथक नर्तक व नृत्यांगना गुरु रोहिणी भाटे यांना आदरांजली देण्यासाठी आपली नृत्यकला सादर करतील. या कार्यक्रमात पं. बिरजू महाराज यांची नात आणि कथक नृत्यांगना रागिणी महाराज, जयपूरच्या मनीषा गुलयानी, बंगळूरूच्या कथक नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका मधू नटराज आणि नंदिनी मेहता, जयपूर घराण्याच्या कथक नृत्यांगना विधा लाल, पश्चिम बंगालचे नर्तक अशीमबंधू भट्टाचार्य, सौविक चक्रवर्ती, रायगड घराण्याच्या परंपरेतील अल्पना वाजपेयी याबरोबरच जयपूर घरा गौरी दिवाकर, स्वाती सिन्हा, धीरेंद्र तिवारी आणि मधु नटराज आपली नृत्यसेवा सादर करतील.        

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतartकला