शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठा; नागरिक हैराण, नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:51 IST

लोणावळा : लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागात महिनाभरापासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे.

लोणावळा : लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागात महिनाभरापासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. टाटा कंपनीच्या वलवण धरणांमधून लोणावळा शहर व परिसरातील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, कार्ला, वेहेरगाव आदी गावांना कार्ला प्रादेशिक पाणी योजनेद्वारे, तसेच कुसगाव, डोंगरगाव परिसरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महिनाभरापासून नळाद्वारे येणारे पाणी अतिशय दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.नळाद्वारे येणारे पाणी हे पिवळसर रंगाचे असून, त्याचा अक्षरश: गटारीतील पाण्याप्रमाणे घाण वास येत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घरात पाण्याचे हंडे असो वा बादल्या; पाण्याचा एवढा घाण वास येत आहे.लोणावळा नगर परिषद, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, धरणात शेवाळासारखी वनस्पती वर आल्याने खराब पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महिनाभरापासून असा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत. दर वर्षीपेक्षा या वर्षी जास्त पाऊस झाला. वलवण धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही असे घाण पाणी येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी