शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खराब मोबाईल पुरविणा-या कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:38 IST

प्रकाश सपकाळ यांनी 2 जून 2017 ई-बे या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून 8 हजार 499 रुपये किमतीचा लिनोव्हो कंपनीचा फोन खरेदी केला होता.

पुणे : ग्राहकाला खराब मोबाईल पुरविणा-या ईबेला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदाराला नवीन मोबाईल आणि 45 दिवसांत 3 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रकाश दत्तात्रेय सपकाळ (रा. सदाशिव पेठ) यांनी ई-बेच्या मुंबई आणि सिकंदराबादमधील कार्यालयातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. सपकाळ यांनी 2 जून 2017 ई-बे या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून 8 हजार 499 रुपये किमतीचा लिनोव्हो कंपनीचा फोन खरेदी केला होता. 7 जून रोजी त्यांनी दिलेल्या पत्यावर संबंधित मोबाईल पाठविण्यात आला. सपकाळ यांनी पार्सल खोलून पाहिले असता मोबाईल खराब असल्याचे लक्षात आहे. मोबाईलच्या एका बाजूची स्क्रीन फुटलेली होती. त्यामुळे त्यांनी दुस-या दिवशी ई-बेच्या हेल्पलाईनवर फोन करून तसेच कंपनीला मेल करून याबाबत माहिती दिली. कंपनीच्या प्रतिनिधीने मागणी केल्यानुसार त्यांनी मोबाईलचे फोटो देखील पाठवले व मोबाईल बदली करून देण्याची मागणी केली. नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये आणि तक्रार व नोटिसचा खर्च आणि मानसिक त्रासाबद्दल 10 हजार रुपये मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने मंचाकडे दाखल केलेल्या दाव्यात केली होती. 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तूCourtन्यायालय