शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 12:40 IST

कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

ठळक मुद्देअटल आहार योजना : क्रेडाईच्या सहकार्याने शहरात उपक्रम सुरु

पुणे : अटल आहार योजनेअंतर्गत बांधकाम प्रकल्पावरील कामगारांना अवघ्या पाच रुपयांमधे दुपारचे जेवण उपलब्ध होणार आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने या योजनेची गुरुवारी सुरुवात केली. बाणेर येथील कल्पतरु जेड या बांधकाम प्रकल्पावर आयोजित कार्यक्रमात चारशेहून अधिक बांधकाम कामगारांना भोजन देऊन या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कामगार विभागाच्या उपजिल्हा कार्यकारी अधिकारी शीतल निकम, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे तथा कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, कामगार कल्याण समितीचे निमंत्रक पराग पाटील, कल्पतरू प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीलकंठ सरदेसाई या वेळी उपस्थित होते.कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांना वेळच्या वेळी व चांगले अन्न नाममात्र दरात उपलब्ध होणे गरजेचे होते. क्रेडाई पुणे-मेट्रोच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी शासनाला यापुढेही संपूर्ण सहकार्य करु असे आश्वासन कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष श्रॉफ यांनी या वेळी दिले.  मुजावर म्हणाले, ग्रामीण भागात राहणाऱ्या मजुरांचे तिथे कच्चे घर असेल अथवा अर्धा गुंठा जमीन असेल त्यांना पक्के घर बांधून देण्यासाठी सरकारकडून दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळेल. तसेच, घर बांधून झाल्यानंतर आणखी ५० हजार रुपये दिले जातील. नोंदणी झालेल्या कामगारांसाठी सरकारच्या विविध २८ विविध योजना असून, त्याचा फायदा कामगारांनी घ्यायला हवा. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी सरकारच्या योजना असून, त्या साठी त्यांनी अर्ज करावा असे आवाहन निकम यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे