शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जागेवर एमटीडीसीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:02 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भीमाशंकर परिसरात उभारण्यात आलेले भक्तनिवास आदिवासी जागेवर बांधण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भीमाशंकर परिसरात उभारण्यात आलेले भक्तनिवास आदिवासी जागेवर बांधण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण झालेले असताना, प्रशासनाकडून हे निवास अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. मात्र, संबंधित जागा शासनाच्या नावे बक्षीसपत्र करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुढील काही दिवसांत हे भक्तनिवास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) सुरू केले जाणार आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांच्या सोयीसाठी भीमाशंकरजवळील राजपूर येथे पाच एकर जागेत प्रशस्त भक्त निवास उभारण्यात आले. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च आला. पीडब्लूडीकडून भक्तनिवासाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. तसेच, एक कोटी ८० लाख रुपये निधी खर्च करून, २०१६ मध्ये फर्निचरचे काम पूर्ण करण्यात आले. हे भक्तनिवास एमटीडीसीतर्फे चालविले जाणार आहे.या भक्तनिवासाच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर ३८, तर दुसऱ्या मजल्यावर ५४ आणि तळमजल्यावर ७ अशा ९५ खोल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वयंपाकगृह, उपहारगृह,८ लोकनिवास, २ बैठककक्ष अशा एकूण १०८ खोल्यांचे हे भक्तनिवास आहे. दरम्यान, सुमारे वर्षभरापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या भक्त निवासाची हस्तांतरप्रक्रिया पूर्ण केली. तसेच, त्याचा ताबा एमटीडीसीकडे दिला आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हे भक्तनिवास सुरू झाले नाही.शासनाच्या नावे बक्षीसपत्र करण्याची प्रक्रिया सुरूश्रावण महिन्याच्या सोमवारी भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे श्रावण महिन्यात हे भक्तनिवास सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, संबंधित इमारत आदिवासी जागेवर बांधण्यात आल्यामुळे हे भक्तनिवास सुरू करता येत नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित जागा शासनाच्या नावे बक्षीसपत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर एमटीडीसीतर्फे हे भक्तनिवास सुरू केले जाईल, असे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे