शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक धर्मासाठी संविधानच धर्मग्रंथ : शमशुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 15:53 IST

देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले.

ठळक मुद्दे‘भारतीय संविधान आणि मुस्लीम महिलांचे प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन तांबोळी यांचे मार्गदर्शनधर्मातील जाचक रुढींविरुद्ध लढण्यासाठी पीडित महिलांनीच एकत्र यावे : तांबोळी

पुणे : देशात संविधान हे सर्वोच्च असल्याने भारतातील सर्व धर्मियांसाठी हाच धर्मग्रंथच असला पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय संविधान आणि मुस्लीम महिलांचे प्रश्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. विद्यागौरी टिळक, सीएमईचे प्रशासन अधिकारी महादेव कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. टिळक यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.डॉ. तांबोळी म्हणाले, की तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांचे प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर आले असताना हे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय संविधानातील तरतुदींचा आधार घेणे आवश्यक आहे. धर्मग्रंथातील रूढींचा धर्मवादी संघटनांकडून गैरवापर करून महिलांचे आणखी खच्चीकरण केले जात आहे. सरकारही विधेयकाच्या रूपाने सुधारणा करण्याचे आश्वासन देत असले तरी शरियतच्या नावाखाली सुरु असलेल्या रुढींच्या उच्चाटनासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. आत्ताच्या ट्रिपल तलाक विधेयकाबाबतही सरकारची अशीच भूमिका आहे. धर्मातील या जाचक रुढींविरुद्ध लढण्यासाठी पीडित महिलांनीच एकत्र यावे.समाजातील विविध घडामोडीचे ज्ञान आणि त्यावर विद्यार्थ्यांनी विचारमंथन करावे यासाठी विभागाकडून  व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. अशा व्याख्यानातून प्रत्यक्ष काम करणाऱ्या  कार्यकर्त्याशी थेट संवाद साधता येतो, असे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. तांबोळी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकानिरसन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबाबू घुले व सागर सुरवसे यांनी केले तर प्रास्ताविक कपिल कांबळे यांनी केले.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकPune universityपुणे विद्यापीठPuneपुणे