शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 15:41 IST

बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानसंगम चर्चासत्रदेश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण अजूनही पारतंत्र्यातच : ओम प्रकाश कोहली

पुणे : बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. शिक्षणाशी जोडली गेलेली संस्कृती व परंपरेची नाळ तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे. देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली. शिक्षणाचे भारतीयकरण करण्याचे आव्हान स्वीकारून त्यादृष्टीने दिशा निश्चित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘ज्ञानसंगम’ या दोन दिवसीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरूध्द देशपांडे, मंचचे प्रांत संयोजक हरिभाऊ बिरासदार, संयोजक प्रा. आनंद लेले, जे. नंदकुमार व्यासपीठावर उपस्थित होते. ‘भारतीय शैक्षणिक परंपरेमध्ये राष्ट्रबोध आणि वर्तमान संदर्भ’ हा या चर्चासत्राचा विषय आहे. कोहली म्हणाले, मुस्लिम राजवटी सुमारे हजार वर्षांच्या काळात देशातील लोकांनी केवळ राजकीय पराभव स्वीकारला होता. पण केवळ केवळ १९० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीमध्ये लोकांनी राजकीय पराभवाबरोबरच मानसिक पराभवही स्वीकारला. देशाला ७० वर्ष स्वातंत्र्य मिळूनही आपण या मानसिक पराभवातून बाहेर पडलो नाही. महात्मा गांधी यांची पुर्ण स्वराज्याची कल्पना आज दिसत नाही. ‘स्व’ म्हणजे आपली परंपरा ज्या राज्यामध्ये प्रतिबिंबित होते ते ‘स्वराज्य’ त्यांना अपेक्षित होते. त्यासाठी शिक्षणाला आपली संस्कृती व परंपरेशी जोडण्याची गरज आहे. हे करत असताना ते कालानुरूप असायला हवे. आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासही हे शिक्षण सक्षम असावे. युरोपीय शिक्षणामुळे हिनता बोध निर्माण झाला. मुल्यांचा र्‍हास होण्याबरोबरच आपण परंपरेपासून वेगळे झालो.भारत हा सर्वसमावेशक देश आहे. हा देश सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. देशाची संस्कृती आणि परंपरेतच हे मुळ आहे. पाश्चिमात्य देशांसारखा संकुचित नाही. मात्र, अद्याप आपण राष्ट्राची दिशा, राष्ट्रदर्शन निश्चित करू शकलो नाही, असे मत डॉ. कृष्ण गोपाळ यांनी व्यक्त केले. डॉ. करमळकर यांनी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्वांना समान शिक्षण देणे हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगितले. बिरासदार यांनी प्रास्ताविक केले. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठeducationशैक्षणिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ