शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती कुणालाही देताना विचार करा!...फसवणुकीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 17:57 IST

तुमच्या अकाऊंटसह डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुणी मागितली तर कदाचित तुम्ही फसवलेही जाऊ शकता. गेल्या दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसायबर क्राईम सेलकडे गेल्या नऊ महिन्यात १२३ अर्ज प्राप्त अर्जदारांचे तब्बल ६० लाख रूपयांचे रिफंड मिळविण्यात सेलला यश

पुणे : तुम्हाला रिवॉर्ड पॉर्इंटचे तुमचे पैसे अकाऊंटला डिपॉझिट करून देतो किंवा अकाऊंटची माहिती अपडेटस करून देतो असे सांगून तुमच्या अकाऊंटसह डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुणी मागितली तर, थांबा, विचार करा! कदाचित तुम्ही फसवलेही जाऊ शकता. तुमच्याकडून ही माहिती दिली गेल्यास तुमच्या खात्यातून संबंधित व्यक्तीकडून कुठूनही ट्रन्झॅक्शन केली जाऊ शकते आणि तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.गेल्या दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. सायबर क्राईम सेलकडे गेल्या नऊ महिन्यात १२३ अर्ज प्राप्त झाले असून, अर्जदारांचे तब्बल ६० लाख रूपयांचे रिफंड मिळविण्यात सेलला यश आले आहे. देशात नोटाबंदी लागू झाल्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डने व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.  कार्डचा जास्तीत जास्त वापर करणार्‍या खातेदाराला बँकेकडून रिवॉर्ड पॉर्इंट्सही दिले जातात. याचाच फायदा घेऊन खातेदारांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. आपल्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा बँकेचा मेसेज आल्यानंतरच संबंधित व्यक्तीला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. सायबर क्राईम सेलकडे तत्काळ अर्ज केला तर व्यवहार त्वरित थांबवता येऊन पैसे परत मिळण्यास मदत होते. फसवणूक करणारी व्यक्ती ही बहुतांश वेळेला महाराष्ट्राबाहेरीलच असते. पैसे खर्च झाल्यावर त्याच्याकडून पैसे जप्त करणे अवघड होते. यासाठी अर्जदाराने दोन ते तीन तासांच्या आतच सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.  

 

सायबर क्राईम सेलकडे तक्रार आल्यावर ज्या मर्चंटला पैसे गेले असतील त्यांना ईमेल करून व्यवहार हा फसवणुकीचा असल्याने ते पैसे आहे तसे रोखण्यास सूचना दिल्या जातात. कोणताही व्यवहार पूर्ण होण्यासाठी अर्जदाराकडून मर्चंटकडे व मर्चंटकडून विक्रेत्याकडे पैसे जाण्यासाठी काही कालावधी लागतो. यादरम्यान अर्जदार यांनी सायबर सेलकडे संपर्क साधल्यास व्यवहार त्वरित थांबवता येऊ शकतील.- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे

 

२०१६ आणि २०१७ मध्ये सायबर क्राईम सेलकडून रिफंड करण्यात आलेली रक्कम आणि आकडेवारी                                                   रिफंड अर्ज संख्या             रिफंड झालेली रक्कम२०१६                                           ६६                                   २३, ५७, ०९२२०१७ (जानेवारी ते सप्टेंबर)        १२३                                  ६०, २४, ९६२ 

टॅग्स :bankबँकCrimeगुन्हा