शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

नैसर्गिक जलस्रोताचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 07:05 IST

जागा आरक्षित करण्याची मागणी; बावधनमध्ये होणार जलपूजन

पाषाण : माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हृदयाशी, हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाह पुनरुज्जीवन करण्यात येत आहेत. त्यामुळे एक नवी जलचळवळ उभी राहत आहे. नैसर्गिक जलस्रोतांवर आरक्षण टाकून ते संरक्षित करावेत, अशी मागणी जलप्रेमींनी केली आहे.पुणे शहरातील बावधन परिसरातून राम नदी वाहते. एकेकाळी शुद्ध, सदानीरा असणारी राम नदी आता मरणासन्न अवस्थेत आहे. तिला पुन्हा जिवंत करायचे असेल तर तिचे संरक्षक कवच असणारे ओढे-नाले जिवंत केले पाहिजेत आणि झरे कायमस्वरूपी सुरक्षित केले पाहिजेत. असाच एक जिवंत झरा आणि बावधन ओढाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सामान्य माणसाला जिवंत झऱ्याशी जोडू या मोहीम सुरू करण्यात आली.बावधनमधील ओढ्यातील भर उन्हाळ्यात आजसुद्धा प्रतिदिन १ लाख लिटर आणि वर्षाला साडेतीन कोटी लिटर पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध जिवंत झºयातून मिळत आहे. त्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी मागील वर्षभर प्रयत्न करण्यात आले असून या पाण्याच्या प्रवाहांना शासनाने आरक्षित करावे व त्यांना ऐतिहासिक ठेव्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. बावधन गावात नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेल्या जलस्रोताचे अतिक्रमण व प्रदूषणापासून संरक्षण व संवर्धन करण्यासाठी या बाबतीत गेल्या वर्षांपासून पुणे महानगरपालिका आयुक्त व महापौर, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय संचालक, केंद्रीय भूजल मंडळ, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याशी ईमेल तसेच पत्राद्वारे संपर्क साधला आहे, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकाराने उत्तर आलेले नाही, असे जलप्रेमींनी सांगितले. यावर्षी जलपूजन करून पुन्हा बावधनमधील सर्व नागरिक मिळून असा स्वच्छ जिवंत पाण्याचा झरा बंद होण्यापासून व प्रदूषणापासून सुरक्षित करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व शासनाला आवाहन करणार आहेत.रामनदी जलकलश पूजन उद्यागेल्या वर्षी जलमंदिर कल्पना साकारून या झºयाचे पूजन करण्यात आले. नदी पात्रातील झरे शोधून नागरी सहभागातून स्वच्छ करण्यात येत आहेत. २२ एप्रिल रोजी रामनदी जलकलश पूजा करून हा हजारो नागरिकांची तहान भागवेल अशा स्वच्छ जिवंत पाण्याचा झरा बंद होण्यापासून व प्रदूषणापासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवक, गावकरी, विविध संस्थांनी केला आहे.जलस्रोत बंद होऊ नये म्हणून केलेल्या मागण्या...जलस्रोताच्या आसपासची जागा संगनमताने आरक्षित करणे गरजेचे आहे.जिवंत तीन स्रोत वाचवण्यासाठीचे अनुभवी जल तज्ज्ञ, भूगर्भशास्त्र तज्ज्ञांची कमिटीच्या सल्ल्यानुसार काम केले तर हा जल स्रोत नक्कीच पिढ्यान्पिढ्या स्वच्छ पाणी देत राहील. तीन हजार नागरिक या पाण्याचा वापर करतात. ते याच पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्याचे संवर्धन होणेआवश्यक आहे. शासन स्तरावर ओढे व झरे यांचा रामनदी प्रश्नावर अभ्यास करणे गरजेचे आहे.नैसर्गिक ‘जलदेवता’ मंदिर संकल्पनानिसर्गाच्या कुशीत आकाशातून पडलेला पावसाचा थेंब वाहून जाऊ नये किंवा त्याचे बाष्पीकरण होऊ नये म्हणून धरणीमातेने आपल्या उदरामध्ये जपून ठेवला. त्यानंतर संपूर्ण वर्षभर १२० ते १४० लिटर प्रतिमिनिट म्हणजेच जवळजवळ एक लाख लिटर प्रतिदिन या जलस्रोतातून पाणी मिळते. हे पाणी टेस्टिंग करून पिण्यालायक आहे, याची खात्री करून घेतली आहे. अशा नैसर्गिकरित्या जलप्रदान करणाºया ‘नैसर्गिक जलदेवता मंदिरांचे’ संरक्षण करणे गरजेचे आहे, असे जलप्रेमींनी सांगितले. जलदेवता मंदिर म्हणजे झरा होय.

टॅग्स :Waterपाणी