काँग्रेसच्या प्रदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:01+5:302021-09-02T04:22:01+5:30

बारामती: पडस्थळ (ता. इंदापूर) येथील मनेष राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाली आहे. राऊत यांच्या ...

Congressional Territories | काँग्रेसच्या प्रदेश

काँग्रेसच्या प्रदेश

बारामती: पडस्थळ (ता. इंदापूर) येथील मनेष राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाली आहे. राऊत यांच्या रुपाने पुन्हा एकदा काँग्रेसने इंदापूर तालुक्यात राज्यस्तरावरील पद दिल्याने कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

मनेष राऊत यांनी युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात अनेक पातळीवर काम केले आहे. त्यांच्या निवडीने काँग्रेसने ओबीसी चेहऱ्याला प्रतिनिधित्व दिल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षात असताना सरकारविरोधात कार्यक्रम अंमलबजावणी समितीत त्यांना स्थान देण्यात आले होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपावली होती. आता राऊत यांची प्रदेशसचिवपदी नियुक्ती होणे आगामी काळात पक्षविस्तार आणि इंदापूर तालुक्यातील पक्षबांधणीसाठी महत्वाची मानली जाते. काँग्रेसचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सचिवपदाची जबाबदारी पार पाडेन, असा विश्वास मनेष राऊत यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केला आहे.

०१०९२०२१-बारामती-०१

Web Title: Congressional Territories