दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पर्वती पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून धीरज घाटे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, सपकाळ यांनी केलेल्या एका वक्तव्यात टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकक्ष असल्याचे म्हटले होते. या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांकदे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी रविवारी पुणे शहर भाजपकडून काँग्रेस भवन कार्यालयासमोर आंदोलन केली जाणार आहे.. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Web Summary : Congress leader Harshvardhan Sapkal faces FIR in Pune for allegedly inflammatory remarks comparing Tipu Sultan to Shivaji Maharaj. BJP protests are planned, escalating political tensions.
Web Summary : कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल पर शिवाजी महाराज से टीपू सुल्तान की तुलना करने वाली कथित भड़काऊ टिप्पणी के लिए पुणे में प्राथमिकी दर्ज। भाजपा विरोध प्रदर्शन की योजना बना रही है, जिससे राजनीतिक तनाव बढ़ गया है।