शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'परदेश दौऱ्यांची संख्या हाच कामाचा निकष असता, तर वैमानिक परराष्ट्रमंत्री झाले असते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 21:13 IST

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर काँग्रेस खासदार कुमार केतकरांचा टोला

पुणे: काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी पंचप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टोला लगावला आहे. मोदी यांनी किती देशांना भेटी दिल्या, यावरून परराष्ट्र धोरण यशस्वी ठरत नाही. तसं असतं तर वैमानिकांना परराष्ट्रमंत्री केलं असतं, असा टोला केतकर यांनी लगावला.पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. रिझर्व्ह बँक, नोटाबंदीचा निर्णय, रघुराम राजन यांचा राजीनामा या सर्वच मुद्यांवरुन त्यांनी मोदींवर तोफ डागली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अवमूल्यन केलं. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन हेराफेरी केली,' असा थेट आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या राजीनाम्यावरुनही केतकर यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं. 'ज्या रघुराम राजन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्यास भाग पाडलं ते आता बँक ऑफ इंग्लडचे प्रमुख होऊ शकतात,' असा दाखला केतकर यांनी दिला. 'मोदींनी स्वतंत्र दहशत यंत्रणा तयार केली आहे. काही दिवसांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मागे टाकतील. त्यांच्यात आणि संघात दहशतीची स्पर्धा सुरू आहे,' असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत मोदी स्वतः घेतलेल्या निर्णयांची पानं पत्त्यासारखी मंत्र्यांच्या हाती देतात. भारताला असा खोटारडा पंतप्रधान भविष्यात कधीही मिळू नये, असंही केतकर यांनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरणRaghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक