शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

खेड, जुन्नरमध्ये शिवसेनेला काँग्रेसचा हात

By admin | Updated: March 15, 2017 03:23 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालानंतर लक्ष लागलेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीत जिल्ह्यात एक वेगळा पॅटर्न पहावयास मिळाला

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालानंतर लक्ष लागलेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीत जिल्ह्यात एक वेगळा पॅटर्न पहावयास मिळाला. जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने ‘हात’ दिला असून येथे उपसभापतिपद पदरात पाडले आहे. तर १३ पैैकी सात पंचायत समितीवर राष्ट्रवादीने दोन्ही पदांवर वर्चस्व मिळवले आहे. दोन ठिकाणी काँग्रेसचे, तीन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी भाजपाचे सभापती झाले आहेत. २१ फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषद व १३ पंचायत समितीसाठी निवडणूक झाली. २३ फेबु्रवारी रोजी निकाल लागून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत बहुमत मिळवले. ७५ पैैकी ४४ जागा मिळवल्या. तर आंबेगाव, बारामती, भोर, दौैंड, शिरूर, मुळशी या पंचायत समित्यांत बहुमत मिळवले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही पदे मिळवता आली आहेत. तसेच पूर्ण बहुमत न मिळालेल्या वेलीत सभापती व उपसभापतीही राष्ट्रवादीचे झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या हवेली पंचायत समितीत २६ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाचे ६, तर शिवसेनेचे ५ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल झाले होते. त्रिशंकू अवस्थेत बाजी मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाची साथ मिळणे आवश्यक होते. ती कमतरता लोणी काळभोर गणातून अपक्ष निवडून आलेले उमेदवार युगंधर ऊर्फ सनी काळभोर यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यांमुळेच हवेलीचे सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेत त्यांना जागा मिळविन्यात अपयश आले होते. मात्र पंचायत समितीवर त्यांचे वर्चस्व राखले होते. आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. तसेच वेल्हा तालुक्यात काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात फक्त जुन्नर पंचायत समिती ताब्यात असलेल्या शिवसेनेने यावर्षी पुरंदर व खेड या दोन पंचायत समित्यांवर भगवा फडकावला आहे. पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला हद्दपार करीत शिवसेनेने ३ जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण ताब्यात घेतले होते. त्यामुळे तेथे शिवसेनेने दोन्ही पदे घेतली आहेत. खेड तालुक्यातही शिवसेनेचे सभापती व उपसभापती झाले आहेत. राज्यात विजयाची घौैडदौैड सुरू असलेल्या भाजपाला मात्र जिल्ह्यात शिरकाव करता आला नाही. पूर्वीची त्यांच्या ताब्यात असलेली मावळ पंचायत समितीचे फक्त त्यांचे सभापती व उपसभापती झाले आहेत.जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत १४ जागा पैकी ७ जागा शिवसेनेने काबीज केल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळविला होता. तालुका सभापती पक्ष उपसभापती पक्षआंबेगाबउषा रमेश कानडेरा. कॉँनंदकुमार शंकर सोनावलेरा. कॉँबारामतीसंजय पंडीत भोसलेरा. कॉँशारदा राजेंद्र खराडेरा. कॉँभोरमंगल सोपान बोडकेरा. कॉँलहू हरिभाऊ शेलाररा. कॉँदौंडमीना दिनकर धायगुडेरा. कॉँसुशांत सुनील दरेकररा. कॉँहवेलीवैशाली गणेश महाडीकरा. कॉँअजिंक्य सुरेश घुलेरा. कॉँइंदापूरकरणसिंह अविनाश घोलपकॉँग्रेसदेवराज कोंडीबा जाधवकॉँग्रेसजुन्नरललिता उमेश चव्हाणशिवसेनाउदय बाबासाहेब भोपेकॉँग्रेसखेड सुभद्रा विष्णू शिंदेशिवसेनाअमोल गुलाबराव पवारकॉँग्रेसमावळगुलाबराव गोविंद माळसकरभाजपाशांताराम सीताराम कदमभाजपामुळशीकोमल गणेश वाशिवलेरा. कॉँ.पांडुरंग मारुती ओझरकररा. कॉँपुरंदरअतुल रमेश म्हस्केशिवसेनादत्तात्रय शंकर काळेशिवसेनाशिरूरसुभाष बापूराव उमापरा. कॉँमोनिका नवनाथ हरगुडेरा. कॉँवेल्हासीमा विष्णू राऊतकॉँग्रेसदिनकर पांडुरंग सरपालेकॉँग्रेस