भाजपच्या सत्तेविरोधात रान उठवण्याचा काँग्रेसचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:05+5:302021-06-24T04:10:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी शहरातील समस्यांवर काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त या पद्धतीने काम ...

Congress decides to revolt against BJP rule | भाजपच्या सत्तेविरोधात रान उठवण्याचा काँग्रेसचा निर्धार

भाजपच्या सत्तेविरोधात रान उठवण्याचा काँग्रेसचा निर्धार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी शहरातील समस्यांवर काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त या पद्धतीने काम करत आहे. त्याविरोधात आंदोलने करून जनमत जागृत करण्याचा निर्धार शहर काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी म्हणून शहर काँग्रेसची बुधवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये बैठक झाली. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, असीम शेख तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिंदे यांनी महापालिकेतील ३९२ कोटींच्या निविदेतील गैरप्रकार उघड केले. तिवारी यांनी मेट्रो प्रकल्पातील निधी कमी केला ते उजेडात आणले. अशी अनेक प्रकरणे आहेत. शहरातील विकासकामांची नावे घेत त्यातील कामांमध्ये भाजपकडून भ्रष्टाचार सुरू आहे, त्याविरोधात आंदोलन करण्याचे बैठकीत एकमताने ठरले.

संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक प्रभागाला अध्यक्ष तसेच पक्ष कमकुवत आहे अशा ठिकाणी बूथ कमिट्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निवडणूक महाविकास आघाडी करून लढवायची का, स्वबळावर लढायची का असे विषय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, त्याचा विचार करण्याऐवजी पक्षबळ वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे असे ठरले.

Web Title: Congress decides to revolt against BJP rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.