शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
2
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
3
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
4
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
5
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
6
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
7
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
8
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
9
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
10
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
11
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
12
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
13
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
14
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
15
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
16
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
17
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
18
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
19
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
20
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार

मंगेश तेंडुलकर यांची परंपरा जपली , वाहतुकीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 03:19 IST

प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने २० वर्षे नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ते प्रयत्नशील होते.

पुणे : प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने २० वर्षे नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर, नात श्रावणी ढवळे, शुभंकर ढवळे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विजय कदम, सचिन दांगट, वैष्णवी दांगट, मोहन आपटे, पूजा गिरी, प्रदीप गिरी, बाबा चौकसे यांच्यासह वाहन अपघातात आपल्या मुलांना गमावणारे गुरुसिद्धय्या स्वामी, शशी स्वामी, स्नेहल स्वामी तसेच वाडिया कॉलेज जवळील अपघातात आपल्या कन्येला गमावलेल्या सुनंदा जप्तीवाले हेही सहभागी झाले होते.१ वंदना तेंडुलकर म्हणाल्या, ‘‘बाबांना दिवाळीच्या फराळात नवीन कपडे किंवा इतर कशातही रस नव्हता. समाजातील उणीवा दूर करण्याचा ध्यास होता. अपघातांमध्ये कोणाचे ही कुटुंबीय दगावू नयेत, यावर त्यांचा भर होता. वाहतूक नियम पाळा, हा सोपा संदेश ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून देत असत.२ केवळ दंडात्मक कारवाईतून नव्हे तर लोकप्रबोधनातून वाहतूक समस्या सुटू शकेल, असा तेंडुलकर यांचा विश्वास होता, असे गेली १३ वर्षे या उपक्रमात सहभागी होणारे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.३ कोणत्याही मोठ्या माणसाच्या निधनापश्चात त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली, असे मत नगरसेविकामंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणे