शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

काय चाललंय काय? एकावेळी द्या दोन जिल्ह्यात परीक्षा?; आरोग्य विभागाच्या पदभरतीत उमेदवारांमध्ये गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 22:04 IST

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट (प्रवेश पत्र) देण्यात आले आहे.

पुणे: राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट (प्रवेश पत्र) देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शासनाने हा गोंधळ दूर करावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाने २०१९ मध्ये ५२ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते.तसेच उमेदवारांना पद भरतीच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणा-या विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.त्यासाठी प्रत्येक आरोग्य विभागाकडून ३५० शुल्कही आकारण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ५ ते ६ पदांसाठी अर्ज केले.त्यावर उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार उमेदवारांनी दोन पर्यायांची निवड केली.उमेदवांना परीक्षांचे प्रवेशपत्र २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यात दोन्ही परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी होणार असून दोन्ही पदांच्या परीक्षेच्या वेळा, उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक सारखे देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत.  एकाच वेळी दोन ठिकाणी परीक्षा देणे शक्य नसल्याने गोंधळाने निर्माण झाला आहे. 

"माझ्यासह अनेक उमेदवारांनी दोन पदांसाठी अर्ज केले आहेत. माझ्या दोन वेगळ्या प्रवेशपत्रावर पुणे आणि नाशिक अशी ठिकाणे आली आहेत. दोन्ही परीक्षेचा दिनांक आणि वेळ सारखीच आहे. एक उमेदवार एका वेळेस दोन ठिकाणी परीक्षा देऊ शकणार नाही. प्रवेशपत्रावर अशी चूक होणे हास्यास्पद असून याचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा" -  ज्ञानेश्वर विळेकर, परीक्षार्थी, उमेदवार

टॅग्स :Healthआरोग्यjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्या