शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहिमेतील गोंधळ अजूनही कायम! केंद्रांवर नागरिकांचे हाल, नियोजनाची आवशक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 13:21 IST

काही नागरिकांना सलग ५, ६ दिवस ४,५ तास थांबूनही लस न मिळाल्याची निराशा

ठळक मुद्देनियोजनासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारण्यास आम्ही तयार

पुणे: पुण्यात लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा चालू आहे. सुरुवातीला लसींचा तुटवडा जाणवत नव्हता. मागील काही आठवड्यांपासून कोरोनाच्या औषधांबरोबरच लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यानंतर लसीकरण मोहिमेत अनेकांना लस न घेता माघारीही फिरावे लागले. जवळपास तीन आठवडे झाले हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अजूनही लसीकरण मोहिमेत सर्वत्र गोंधळ असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रांवर नियोजनाची आवशक्यता असल्याची मागणी  माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. 

लसीकरण केंद्रांवर सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. केंद्रावर सकाळी लवकर येणार्‍यांना टोकन दिले जात असून त्यामुळे पहाटे पासून रांगा लागत आहेत. यात आदल्या दिवशीची यादी शिल्लक असेल तर एकही टोकन दिले जात नाही. काही ज्येष्ठांचा एक डोस घेऊन ४५/५०  दिवस होऊन गेले आहेत. त्यांना प्राधान्य देण्याविषयी नियोजन करण्यात येत नाही. असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.  काही नागरिक सलग 5/6 दिवस  4/5 तास थांबून निराशेत परत येत आहेत. कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशील्ड काही केंद्रांवर आलटून पालटून येत आहेत. त्यामध्ये आज कोणती लस दिली जाणार आहे. यावरूनही सावळा गोंधळ उडत आहे. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. केंद्रावर आदल्या दिवशी दुसर्‍या दिवशीची यादी आणि लस चा प्रकार लिहिल्यास गोंधळ आणि संसर्गाचा धोका दोन्ही टळणार आहे. सर्वात भयानक म्हणजे, लस कमी प्रमाणात येत असल्याने काही ठिकाणी तर एका  कुपीतून ११/१२ जणांना लस दिल्याचे कानावर आले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. ही नागरिकांशी फसवणूक आहे. हा त्यांच्या जिवाशी खेळ आहे. यातील तथ्य तपासून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. 

त्यामुळे रोज सायंकाळी दुसर्‍या दिवशी साठीचे नंबर लाऊन बाहेर यादी जाहीर करण्यात यावी. तसेच दुसर्‍या दिवशी कोव्हॅक्सिन आहे का कोव्हीशील्ड आहे ते ही जाहीर करावे. दुसरा डोस असणार्‍यांना प्राधान्य देण्यात यावे. या साठी स्वयंसेवकांची आवश्‍यकता असल्यास तसे नियोजन करण्यास आणि स्वेच्छेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यास आम्ही तयार आहोत. अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.   

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसMLAआमदारGovernmentसरकार