शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ससून रुग्णालयात बदल्यांवरून परिचारिकांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 15:06 IST

बदल्या व संपाबाबत सोमवारी (दि. ९) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ठळक मुद्देसंपाविरुध्द काही रुग्णांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखलसर्वच परिचारिकांमध्ये संभ्रम तसेच कारवाईची भीती कायम

पुणे : परिचारिकांच्या बदल्यांवरून ससून रुग्णालयातील वातावरण अद्यापही तापलेले आहे. त्यामुळे येथील अन्य परिचारिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बदल्या व संपाबाबत सोमवारी (दि. ९) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांच्याविरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन या परिचारिकांच्या संघटनेने बुधवारी (दि. ४) संप पुकारला होता. या संपाविरुध्द काही रुग्णांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी (दि. ३) सुनावणी होऊन न्यायालयाने राज्य सरकारला डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांनाही महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा २०११, कलम ४ (१) (मेस्मा) लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. तर दुसरीकडे ससून रुग्णालय प्रशासनानेही औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने रुग्णालयाच्या ५०० मीटरच्या आत आंदोलन करण्यास मनाई केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक परिचाारिकांमध्ये संपाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तसेच संपाच्या पार्श्वभुमीवर रुग्णालय प्रशासनानेही बाहेरील रुग्णालयातील परिचारिकांची व्यवस्था केली होती. पोलीस फौजफाटाही बोलाविण्यात आला होता. पण संपाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यानंतरही परिचारिकांच्या बदल्यांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच सोमवारी औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये न्यायालयाच्या निर्णयाकडे प्रशासनासह परिचारिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे संपाबाबत असोसिएशनकडून अद्याप निर्णय घेण्यात आला नसला तरी सर्वच परिचारिकांमध्ये संभ्रम तसेच कारवाईची भीती कायम आहे. 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCourtन्यायालय